नाशिकच्या शरयू व अजिंक्यची जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

0
नाशिक | जर्मनी येथे आयोजित वर्ल्ड तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. या संघात नाशिकचे दोन चेहरे दिसणार आहे. नाशिकचे तलवारबाज अजिंक्य दुधारे आणि शरयू पाटील यांची या संघात निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  
दिनांक १८ ते २२ जुलै दरम्यान जर्मनी येथील  लिपीझिंग येथे जागतिक तलवारबाजी वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिलांचे संघ सहभाग होत आहेत.
भारताच्या संघात नाशिकचे तालवारबाज अजिंक्य दुधारे आणि शरयू पाटील या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. नाशिकच्या या दोन खेळाडूंना नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सत्कार करून त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या. या वेळी भारतीय तलवारबाजी संघटनेचे सचिव अशोक दुधारे, क्रीडा संघटक आनंद खरे, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नाशिकमध्ये खेळाचे चांगले वातावरण असून क्रीडा संघटनाही चांगले काम करत आहेत. त्यामुळे अजिंक्य दुधारे आणि शरयू पाटील या  नाशिकच्या दोन खेळाडूंचा भारताच्या संघात समावेश झाला आहे.
अजिंक्य दुधारे याने याआधी ३ वेळा अश्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.  त्याने ३२ वेळा आशियाई स्पर्धा. राष्ट्रकुल स्पर्धा, आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचाही प्रतिनिधीत्व केले असून सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची कमाई केलेली आहे.
तर शरयू पाटील हिनेही फॉईल या प्रकारात आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. हे दोन्ही खेळाडू जर्मनीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

*