Type to search

Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी नाशिकची धनश्री राठी पात्र

Share

नाशिक | प्रतिनिधी

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) मान्यतेने व दिल्ली बुद्धिबळ संघटनेतर्फे 14 ते 26 ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे होणार्‍या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जानोरी आंबे या डिंदोरी तालुक्यातील खेडेगावातील धनश्री अनिल राठी (आंतरराष्ट्रीय रेटिंग 1692) हिला मिळाली आहे. धनश्री बीवाय के महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर धनश्रीने केलेल्या उलेखनीय कामगिरीच्या जोरावर तिला सृष्टीने ही सुवर्णसंधी मिळविली आहे. मोरफी चेस अकॅडेमीतर्फे तिचा गौरव करण्यात आला व तिला शुभेछा देण्यात आल्या.

या स्पर्धेत भारतासह रशिया, अमेरिका, डेन्मार्क, नुझीलंड, अर्मेंनिया, नेदरलँड, पोलंड यासह एकूण 38 पेक्षाजास्त देशांचे निवडक खेळाडू सहभागी होणार आहेत. धनश्री 19 वर्षाखालील मुलींच्या गटात आपले कौशल्य पणाला लावणार आहे. या गटात एकूण 95 खेळाडू असून त्यात धनश्रीला 87 वे मानांकन आहे या गटात 1 आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर, 17 आंतरराष्ट्रीय महिला मास्टर यासह विविध देशातून निवड झालेले मातब्बर खेळाडू आहेत. स्पर्धेत चीनच्या झी जुनेर (आंतरराष्ट्रीय रेटिंग 2507) हिला प्रथम मानांकन आहे. यावरून स्पर्धेच्या काठिन्य पातळीचा अंदाज येतो.

मागील महिन्यात दिल्ली येथे झालेल्या पश्चिम आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री हिने अतिशय दिमाखदार व सुंदर खेळाचे प्रदर्शन करून आपल्या गुंनांकनात 61 एलो गुणांची भर घातली होती. या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेच्या सहभागातून धनश्रीला मोठा अनुभव मिळेल व तिच्या या निवडीतून नाशिकच्या इतर होतकरू खेळाडूंचा उत्साह वाढेल अशी अपेक्षा नाशिकचे राष्ट्रीय खेळाडू व नामवंत प्रशिक्षक श्री विनोद भागवत यांनी व्यक्त केली. स्पर्धेत उजवल कामगिरी साठी अमित तारे, विनय बेळे, सुनील शर्मा, सुनील मोरे यासह नाशिकच्या सर्व क्रीडाप्रेमीनी तिला शुभेछा दिल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!