नाशिकच्या अर्णवची आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पीयनशिपसाठी निवड

0

नाशिक । बुलांगे स्केटिंग क्लबचा विद्यार्थी अर्णव शिवलाल मंत्री याची आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पीयन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान बेल्जियममध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्केटिंग चाम्पियान्शीपमध्ये सहभागी होण्यासाठी भारतातून 35 खेळाडूंचा चमू लवकरच बेल्जियमला रवाना होणार आहे.

भारतीय संघात निवड झाल्यामूळे अर्णवचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. अर्णव प्युपीलेन प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल अशी माहिती देण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ रोलर्स स्केटिंग(बीएफआरएस) यांच्या द झ्वाटजेस रोलर्स क्लब ऑफ झांडवोर्डे व इंटरनॅशनल डी रोलर स्केटिंग स्पोर्ट्स (एफआयआरएस) यांच्या मध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*