Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन

Share

नाशिक  | प्रतिनिधी 

गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड मनपा कार्यालयाच्या समोरच मोठे भगदाड पडले आहे. अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष केलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी कॉंग्रेसकडून आज आंदोलन छेडण्यात आले.

भगदाडचे काम सुरु करण्यासाठी  भूमिपूजनही तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतर अद्याप कुठलेही पावले उचलण्यात आली नाहीत.

पावसळ्याचे दिवस असल्यामुळे मनपा प्रशासन लोकांचे जीव घेणार की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आज काँग्रेस नाशिकरोड ब्लॉकच्या वतीने खड्याची विधिवत पूजा करण्यात आली.

साखळी उपोषण करून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत ना.रोड मनपाच्या वतीने आरोग्य अधिकारी संजय गोसावी यांनी मध्यस्ती करत या आठवड्यात सदर भगदाडाचे काम चालू होईल असे आश्वासन दिले.

यानंतर ना. रोड मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला सूचना देत, काम चालू करण्याचे आदेश दिले.

याप्रसंगी दिनेश निकाळे, कामिल ईनामदार, कुसुम चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रकाश चंदनसे, मंगेश बनसोडे, अंतुल डंबाळे, अरुणा आहेर, सारीका कीर, एजाज सैय्यद, दिलीप गायकवाड, सिध्दार्थ गांगुर्डे, दत्ता भालेराव, दशरथ साळवे व जितेंद्र बराते यांची उपस्थिती होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!