Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोडला गोळीबार; गालातून गोळी शिरल्याने एक गंभीर जखमी

Share
नाशिकरोडला गोळीबार; गालातून गोळी शिरल्याने एक गंभीर जखमी, nashikroad crime news firing one injured breaking news

नाशिकरोड | प्रतिनिधी 

नाशिक रोड परिसरातील ताजनपुरे मळा येथे गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत विजय यशवंत खराटे उर्फ खेडकर यांच्या गालातून गोळी शिरल्याने खराटे गंभीर जखमी झाले आहेत. खराटे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जयराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली दाखल झाले आहेत.

दरम्यान, जुन्या भांडणातून कुरापत काढत गोळीबार झाल्याचे समजते. अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात खराटे यांच्या गालातून गोळी शिरली, त्यामुळे खराटे गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी खळबळजनक घटना घडल्याने दवाखान्याच्या आवारात मोठी गर्दी यावेळी केलेली दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!