Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : नाशिकरोड परिसरात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद; ठिय्या आंदोलनाने तणाव, शालीमार येथील दुकानेही बंद

Share

शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

नाशिक : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज (दि.24)  ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. शहरात बंदचा प्रभाव जाणवत नसला तरीदेखील नाशिकरोड परिसरात मात्र मोर्चा काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला होता. त्यानुसार वंचितने ठिकठिकाणी बंदसाठी आवाहन केले. सीएए कायदा लागू करण्यामागे सरकारची दडपशाही आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीतून मार्गक्रमन करू लागली आहे. त्यामुळेच आम्ही ‘महाराष्ट्र बंद’ची पुकारल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु तसेच हा बंद शांततेच्या मार्गाने करू असेही प्रकाश आंबेडकर यांनी  सांगितले होते. त्यानुसार आज नाशिकरोड परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वंचित कडून करण्यात आले आहे.

शालिमार येथे डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बंद निमित्ताने वंचित बहुजन आघाडी तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदाेलन केेले. तसेच येथील व्यावसायिकांना बंदचे आवाहन करून त्यात सहभागी हाेण्याचे आवाहन केले. गावात तुरळक गर्दी आहे. वाहतुक सेवा नियमित सुरू आहे. सर्वत्र पाेलिस बंदाेबस्त तैनात आहे. अद्यापपावेताे अनुचित प्रकार कुठेही नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!