डोळ्यांमधील खुपलेले काढणारे जगातले पहिले उपकरण

नाशिकच्या शिरपेचात तुरा; डॉ. बापये यांचे उपयुक्त संशोधन

0
नाशिक । डोळ्यांमध्ये गेलेल्या फॉरेन बॉडीज (बाह्य घटक) डोळ्यांबाहेर काढताना रुग्णांच्या नेत्राला मोठी इजा होऊन त्याला डोळा गमवण्यासोबत जीव धोक्यात येत असे. आता नाशिकच्या नेत्रपटल तज्ञ डॉ. मनिष बापये यांच्या उपयुक्त संशोधनामुळे डोळ्यांमध्ये गेलेले लहान खडे, प्लास्टिक, काचेचे तुकडे, बॅलट (छर्रे)आणि तत्सम वस्तू ‘क्लॉ’ या नव्या उपकरणामुळे काढता येणार आहे.

या उपकरणांद्वारे 100हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. डॉ. बापये हॉस्पिटल अ‍ॅण्ड आय क्लिनिकचे नेत्रपटल तज्ञ डॉ. मनिष बापये यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि डोळ्यांच्या नेत्रपटलाला धक्का न लावता फॉरेन बॉडीज काढण्यासाठी वापरण्यात येणारे ‘फोरेन बॉडी फोरशेप्स’ (क्लॉ) या वैद्यकीय उपकरणामुळे अपघाताने अथवा काही कारणांमुळे डोळ्यात गेलेल्या वस्तू सहज बाहेर काढता येणार आहेत.

जागतिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या अमेरिकन सोसायटी ऑफ रेटीना सर्जन, युरोपियन व्हिट्रीओ रेटायनल सोसायटी या संस्थांच्या रेटीना सर्जन परिषदेमध्ये डॉ. बापये यांच्या या उपक्रमांच्या शोधनिबंधाचे सादरीकरण झाले.
डोळ्यात गेलेले लोखंडाचे कण काढण्यासाठी आतापर्यंत चुंबकीय उपकरणाचा वापर करण्यात येत होता. तसेच खडे, काच, धातुचे तुकडे लहान-मोठे घटक काढण्यासाठी चिमट्यांचा वापर करण्यात येतो.

मात्र डोळ्यात गेलेले जे धातू, घटक चुंबकीय उपकरण आणि चिमट्यालाही दाद देत नसे. या गुंतागुंतीच्या कठीण समस्येवर मात करण्यासाठी डॉ. बापये यांनी फॉरेन बॉडी फोरसेप्स (क्लॉ) या वैद्यकीय उपकरणाचे संशोधन केले. त्याच्या संशोधनावरनंतर त्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरुप मिळाले आहे.

अशा प्रकाराचे वैद्यक शस्त्रक्रियेसाठी ते जगातील पहिले उपकरण ठरले आहे. ‘क्लॉ’ द्वारे डोळ्यात गेलेले 1 सेंमी ते 12 मिमी आकाराचे धातू आदी घटक नेत्रपटलाला काहीही धक्का न लावता बाहेर काढते. त्याच्या या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून अमेरिकन, युरोपीयन, इटली रेटीना सर्जन सोसायटीकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.

‘क्लॉ’ उपयुक्त कसे? : ‘क्लॉ हे उपकण नेत्रपटलला धक्का न लावता डोळ्यात घातले जाते. इंजेक्शनच्या सुईच्या छिद्राच्या आकारातून ते डोळ्यात जाते. त्यानंतर मध्ये असलेले दाते उघडतात आणि त्यातून तारा बाहेर येऊन त्या पंजाने पकडावे तसे डोळ्यातील गेलेले मोठ्या आकारातील धातू, दगड, किटकजन्य घटक उपकरण घट्ट पकडते आणि बाहेर काढते. भारतीय तज्ज्ञ डॉ. मतीन अमीन यांनी डॉ. बापये यांच्या संशोधाला मूर्त स्वरुप देऊन फोरसेप्स क्लॉ बनवले आहे.

कश्मिरी आंदोलक आणि ‘क्लॉ’ : काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांवर (पेलेट) गनमधून गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात रबरी पेलेट घुसल्या होत्या. तेव्हा देशातील अनेक रेटीना तज्ज्ञांनी या रूग्णांच्या डोळ्यातील पेलेट काढण्यासाठी डॉ. मनिष बापये यांच्या क्लॉ या उपकरणाचा वापर केला होता. आजवर 100 हून अधिक रुग्णांवर या उपकरणाच्या आधारे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*