नाशिककरांना कार्बन फायबरच्या सायकलींची भुरळ

0

नाशिक | नाशिक शहर जसे वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते तसेच सायकल कॅपिटल म्हणूनदेखील नावारूपाला येत आहे. शहरातील अनेकजण सायकलचा प्रभावी वापर करतांना दिसून येतात. सायकलचा वापर वाढला तशा नाशिककरांच्या सायकलमध्येही काळानुरूप बदल झाला. नाशिकमध्ये नुकतेच कार्बन फायबरचा वापर करून बनवलेल्या कमी वजनाच्या सायकली दाखल झाल्या असून त्यांची किंमत काही लाखांच्या घरात आहे. 

सध्या अशा सायकलींची चांगलीच चर्चा रंगली असून अनेकांना या सायकलींची भुरळ घातली आहे. जाणून घेऊयात याविषयी सविस्तर…

हाय फ्रेंडस! वेलकम टु यंगिस्तान! थुलथुलीत पोट, हार्ट अ‍ॅटेक, ब्लड प्रेशर, ब्लड सर्कुलेशन, गुडघेदुखीपासुन मुक्तता, मधुमेहावर नियंत्रण, डॉक्टरांच्या इलाजापासुन बचाव अशा एक ना अनेक फायदयांनी युक्त सायकलींग आपण सर्वांनीच करायला हवी असे आरोग्य अभ्यासक सांगतात.

मात्र ही सायकलींग करण्यापुर्वी सायकलच्या जगातील क्रांतीकरी बदल आपण बघु या!

सायकल्समध्ये साधी सायकल आणि गिअर सायकल असे दोन प्रकार पडतात. गिअरच्या सायकल्समध्ये पँडल अ‍ॅडजेस्ट करता येतात. गिअर सायकल चालविण्यास खुपच आरामदायक, त्रासमुक्त व सॉफ्ट असतात. गिअर सायकलमध्ये 22, 24 ,27, 30  गिअरमध्ये सायकली उलपब्ध आहेत.

सायकलसोबतच सायकल जर्सीचीही मागणी

 

भारतीय कंपन्यांच्या सायकली 14 किलो, विदेशी कंपन्यांच्या सायकली 10 किलो, कार्बन फायबरच्या सायकली 6.5 किलो तर अ‍ॅलॉय फ्रेम 6061 मध्ये 10 किलोपासुन पुढे उपलब्ध आहेत. साधी सायकल साधारणत: 5 किलोमीटरपर्यत चालविणे आरामदायक असते तर गिअरच्या सायकली 10 किलोमीटरपर्यंत आरामशीर चालविता येतात.

पुर्वी भारतीय कंपन्या सर्वसाधारणपणे भारतीय माणसाची उंची 5.5 फुट गृहित धरुन त्यानुसार एकाच उंचीच्या सायकली बनवत असत. मात्र आता विदेशी कंपन्या या क्षेत्रात उतरल्याने विविध उंचीच्या सायकली ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत.

सायकलमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार तीन प्रकारच्या सायकलींचे उत्पादन केले जाते. यात ऑफ रोड बाईक, ऑनरोड बाईक, एक्स-बाईक यांचा समावेश आहे.

ऑफरोड बाईक सायकल्स या खराब, कच्च्या रस्त्यांवर चालविल्या जातात. ऑनरोड बाईक सायकल्स या सिटीरोड, प्लेनरोडवर चालविल्या जातात तर एक्सरोड सायकल्स या सिटी बाईक म्हणुन देखील ओळखल्या जातात तसेच हलके वजन, लाँग रुट, आरामदायक प्रवास आणि शॉर्ट पँडलिंगसाठी सायकलींच्या या प्रकाराला पसंतीक्रम मिळतो.

तर स्पोर्टस्, जंपींग, माऊन्टन राईडसाठी माऊन्टन बाईक वापरल्या जातात. माऊन्टन बाईकमध्ये गिअर टाईप, ब्रॉड टायर्स, रफ अ‍ॅण्ड टफ, सस्पेन्शन, डबल सस्पेन्शन, सिंगल, डबल शॉक अ‍ॅब्सॉर्बर हे फिचर्स मिळतात. फॅट बाईक या खराब रस्ते, रेतीमध्ये, ट्रॅफिक जाममध्ये, बर्फामध्ये, कच्च्या रस्त्यांवर चालते.

किडस्(लहान मुलांच्या सायकल्स) सायकलध्ये देखील भरपुर व्हरायटीज् उपलब्ध आहेत. किडस् सायकलमध्ये 14 इंची, 16 इंची, 20 इंची, 14 इंची उपलब्ध आहेत, तर 6, 18 गिअरच्या तसेच मिक्स गिअरमध्येदेखील मिळतात. किडस् सायकल्स 6 हजार पासुन 15 हजारांपर्यत तर रेग्युलर सायकल्स 13 हजार पासुन पुढे, कार्बन फायबरमध्ये 4 लाख 30 हजार पासुन 8 लाख 50 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

तंदुरुस्तीसाठी सायकल गरजेची :  शहरातील शिवशक्ती सायकल्सचे मालक किशोर काळे यांच्याशी सायकलींग, सायकल्स बद्दल संवाद साधला असता, त्यांनी नाशिककरांना तंदुरुस्त राहाण्यासाठी पर्यावरणवादी, प्रदुषणमुक्त अशा सायकलींगचा दैनंदिन जीवनात, ऑफिसला जाण्यासाठी नियमितपणे वापर करावा. आरोग्यदायक तसेच फिटनेससाठी सायकलींग करुन इतरांनाही प्रोत्साहित करावे असा संदेश दिला.

संकलन – दिलीप सुर्यवंशी, मयुर हिवाळे

LEAVE A REPLY

*