Thursday, April 25, 2024
Homeनाशिककरोना संकट : मदतीचे हजारो हात सरसावले

करोना संकट : मदतीचे हजारो हात सरसावले

नाशिक । प्रतिनिधी 

करोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी नाशिककर एकवटले असून गोरगरिब व अनाथांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. अन्नदान, रक्तदान, किराणा सामान वाटप अशी मदत करुन माणुसकीचा धर्म पाळला जात आहे.

- Advertisement -

सकल जैन संघटना यांच्यामार्फत दुपारी सातपुर, उपनगर, द्वारका ते पाथर्डी पुल, म्हसरुळ, सिडको येथील 1650 लोकांना, तसेच रॉबीन हुड आर्मी, वेलकम सहकार्य मित्र मंडळ, श्री नबीन भाई, तपोवन मित्र मंडळ गुरुद्वारा शिंगाडा तलाव, गुरुद्वारा देवळाली, अमिगो ट्रान्सपोर्ट साजीद भाई, लक्ष्मी नारायण संस्थान, वुई फाऊंडेशन यांचेमार्फत नाशिक शहरातील विविध ठिकाणी 5 हजार लोक असे सर्व मिळुन एकुण 6 हजार 650 लोकांना अन्नदान करण्यात आले.

सकल जैन संघटनेमार्फत नवीन सिडको येथे जिल्हा रुग्णालय रक्तपेढीकरिता 54 व्यक्तिंनी, जनकल्याण रक्तपेढी मार्फत 60 व्यक्तींनी रक्तदान केले असून 34 व्यक्ती व संस्थांनी मदतीसाठी सहभाग दर्शविला आहे.

10 हजार लोकांना 18 संस्थामार्फत अन्नदान करण्यात येणार आहे. घोटी येथे 6 संस्थांमार्फत 800 पेक्षा जास्त स्वयंसेवक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 2 संस्थामार्फत 52 हजार मास्क व 1 रुग्णवाहिका उपलब्ध करणार असून 1 संस्था 274 लोकांचे राहण्याची व्यवस्था करणार आहे. तर 10 वाहनांसह तातडीची हेलिकाप्टर सेवाही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

दानशूरांना आवाहन

कोरानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या कामकाजात सुसुत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने एक गुगल स्प्रेडशीट तयार केले आहे. यात दानशूर व्यक्ती व संस्था लॉगिन करून आपली नोंदणी करू शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

या सर्व व्यक्ती व संस्थांच्या कामात समन्वय रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर ( 95455 73109) यांची नियुक्त केली आहे. लाॅगिन करताना यात व्यक्ती, संस्था, मोबाईल क्रमांक, ईमेल, मदतीचे स्वरूप, वस्तुंचा तपशील, संख्या, ज्या ठिकाणी मदत करावयाची आहे ते ठिकाण, तालुका व मदत पोहच करण्याची तारीख नमूद करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या