Type to search

Video : नाशिकची ‘झिवा’ गडचिरोली पोलीसदलात दाखल

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकची ‘झिवा’ गडचिरोली पोलीसदलात दाखल

Share

नाशिक । प्रतिनिधी

झिवा ही बेल्जियम मालोनिस पाच महिन्यांची कुत्री नाशिकमधून गडचिरोली पोलीस दलाच्या श्वानपथकात नुकतीच दाखल झाली. नक्षल व अतिरेकीविरोधी कारवायांमध्ये या कुत्रीचा सहभाग असणार आहे.

झेड पेटस् क्लब येथे विक्रांत देशमूख यांनी झिवाला प्रशिक्षित केले असून तिला इंम्प्रिंटींग पद्धतीने संरक्षक श्वान म्हणून तयार करण्यात आले आहे. तिचे पुढील सखोल प्रशिक्षण गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे.

इंम्प्रिंटींगमध्ये बेल्जियम मालोनिस कुत्र्यांला शोध घेणे, शत्रुचा मागोवा घेणे, सोशलाझेशन म्हणजेच आजूबाजूला कितीही वर्दळ असली तरीही आपल्या कामांत एकाग्रता बाळगणे तसेच जनरलायझेशन म्हणजेच विविध आवाज, माणसे, परिसर यासगळ्या बाबींपासून अलिप्त राहून हँडलरकडे लक्ष देवून त्याचे ऐकणे असे प्रशिक्षण दिले जाते, असे प्रशिक्षक विक्रांत देशमूख यांनी सांगितले.

बेल्जियम मालोनिस ही जात गुराखी श्वान म्हणून गणले जाते. तसेच तपकिरी रंगाच्या या कुत्र्याच्या अंगावर तपकिरी केसांचा थर असतो व त्याची टोके काळी असतात.

याचप्रमाणे नाकाचा आणि कानाचा काही भागदेखील काळा असतो. जगभरात या प्रजातीकडे संरक्षक श्वान म्हणूनच बघितले गेले असून अनेक देशांच्या संरक्षण दलात त्यांचा समावेश केला जातो. हे श्वान उत्साही असून रुबाबदारदेखील मानले जाते.


गुन्ह्यांचा मागोवा घेणारे ‘श्वान’

बेल्जियम मालोनिस या जातीचे श्वान अंमली पदार्थ, स्फोटके शोधण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती शोेधण्यास मदत करतात. पोलिसांना हव्या असलेल्या व्यक्तींचा शोध घेत त्यांच्यावर हे श्वान हल्लादेखील चढवू शकते.


अमेरिकेच्या ताफ्यातही बेल्जियम मालोनिस

बेल्जियम मालोनिस याच जातीच्या कुत्र्याने आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामाबिन लादेनचा शोध घेतला होता. अमेरिकेच्या अत्याधुनिक सैन्यदलात याच जातीच्या श्वानाचा समावेश करण्यात आला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!