Type to search

Breaking News नाशिक

आयर्नमॅन रविंद्र सिंगल यांचे नाशकात जंगी स्वागत

Share

नवीन नाशिक | फ्रान्समध्ये नुकतीच पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पूर्ण करत आर्यनमॅन किताब मिळवला.

या किताबानंतर नाशिकचे नाव जगभर पोहोचवल्याने भारावलेल्या नाशिककरांनी आज दुपारी शहरात परतलेल्या आयुक्त रवींद्र सिंगल यांचे जल्लोषात स्वागत केले.‍

पाथर्डी फाटा येथे या स्वागतासाठी खास मंच उभारून पायघड्या अंथरल्या होत्या. यावेळी नाशिककरांसोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त सिंगल यांनी फ्रान्समधील ही स्पर्धा १७ तासांत पूर्ण करावयाची असते. मात्र डॉ. सिंगल यांनी ही स्पर्धा १५ तास आणि १३ मिनिटातच पूर्ण केली. याआधी सुपर मॉडेल मिलिंद सोमण, आयजी कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ४ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग व ४२ किमी रनिंग अशा या स्पर्धेचे स्वरूप असते.

२०१८ च्या स्पर्धेत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ही स्पर्धा जिंकल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!