Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या सुकन्येला मिसेस महाराष्ट्र गोल्डन हार्टचा किताब

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या दिवा पेजंट इव्हेंटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “मिसेस महाराष्ट्र इंप्रेस ऑफ महाराष्ट्र २०१९ स्पर्धेत नाशिकची सुकन्या शामली गायकवाड कांबळे यांनी मिसेस महाराष्ट्र गोल्डन हार्टचा किताब आपल्या नावे केला आहे. या स्पर्धेच्या दोन प्रकारांत ५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तर राज्यातील ४०० स्पर्धकांमध्ये या ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

दिनांक ५ डिसेंबर २०१९ ते ८ डिसेंबर २०१९ या कालावधीत ही स्पर्धा हयात हॉटेल येथे आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी परदेशातीलही स्पर्धक सहभागी झाले होते.

सिल्व्हर आणि गोल्डन प्रकारांत प्रत्येकी २५ स्पर्धाकांन्ची स्पर्धा होती. नाशिकमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑडीशन पार पडल्या होत्या.

रंप वॉक सेशन आणि इतर वेगळ्या प्रकारचे एक सेशन असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सिने अभिनेत्री वर्षां उसगावकर, आदित्य पांचोली व गुलशन ग्रोव्हर हे होते. तर स्पर्धेचे आयोजन अंजना मास्करनर्स आणि कार्ल मास्करनर्स यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!