Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या सहा खेळाडूंना यंदाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

Share
नाशिकच्या सहा खेळाडूंना यंदाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, nashikites six sports players win shiv chhatrapati award breaking news

नाशिक | प्रतिनिधी 

आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये नाशिकच्या जवळपास सहा खेळाडूंना वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला.

यामध्ये कॅनोईंगमध्ये सुलतान देशमुख, जलतरण डायव्हिंग पोलो प्रकारात सिद्धार्थ बजरंग परदेशी अथलेटीक्समध्ये किसान तडवी, रोइंगमध्ये सूर्यभान तानाजी घोलप, रोइंगमध्ये महिला जागृती सुनील शहारे व दिव्यांग खेळाडू सायली सुनील पोहरे हिला जलतरणमध्ये केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार विजेत्यांना गेट वे ऑफ इंडिया येथे २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारार्थीमध्ये यंदाही नाशिकच्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारात उत्तम कामगिरी बजावल्यामुळे सर्वत्र या खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.

जागृती शहारे, रोइंगपटु व सायली पोहरे जलतरपटू नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!