Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedघराबाहेर जाणार नाही, जाऊ देणार नाही; नाशिककरांनी उभारली निश्चयाची गुढी

घराबाहेर जाणार नाही, जाऊ देणार नाही; नाशिककरांनी उभारली निश्चयाची गुढी

नाशिक | रेवती बडगुजर

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशभरात कोरोना नियंत्रित राहावा यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी आज निश्चयाची गुढी उभारत एकप्रकारे जनजागृतीची शपथच ग्रहण केली. यावेळी अनेकांनी गुढी उभारल्यानंतर मराठी नववर्षाच्या निमित्ताने संकल्पस्वरुपात निश्चय केला. यामध्ये मी घराबाहेर पडणार नाही, घराबाहेर कुणाला जाऊ देणार नाही. गरीब व भुकेल्यास अन्न देईल, वृद्धांना मदत करेल, वाट चुकलेल्यांना वाट दाखवेल असे अनेक निश्चय रुपी संकल्प नाशिककरांनी केले.

- Advertisement -

करोना हा  विषाणू इतका विचित्र आहे कि कोणाला त्याची लागण झालेली आहे हे सांगणे कठीण आहे. त्या व्यक्ती ची चाचणी केल्या शिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते. लक्षणे दिसण्या अगोदरच तो व्यक्ती विषाणू पसरतो. यात अगदी साध्या बोलण्यातून, खोकल्यातुन स्पर्शातुन  हा विषाणू पसरतो. तेंव्हा  आपण सर्वजण जगा वरील संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभेल असे मनाशी ठरवू यात,  अर्थात त्या साठी मनाचा निश्चय करावा लागेल तो म्हणजे  “घरात राहण्याचा” हिच खरी गुढी आपण आज उभारू यात.

शारदा शेलुकर

जागृक नागरीक बनण्यास प्रयत्नशील राहिल

करोनाचे सावट पाहता मी करोना मुक्ती साठी माझे पुरेपूर योगदान देण्याचे ठरवले आहे. तसेच पुढील एकविस दिवस घराबाहेर न पडता सरकारी उपाययोजनांचा अवलंब करेल व इतरांनाही त्यासाठी  जागृक करण्यास माझे योगदान देइल. गर्दीच्या ठिकाणी न जाता पोलिस व सरकारी कर्मचारी वर्गाला बेचात न पाडता त्यांना साहाय्य करेल.

भाग्यश्री बेळे

मला चित्रकलेची मनापासून आवड आहे. मी माझी कला आवर्जून व मनापासून जोपासतो. मी माझी कला  जोपासण्याचा व अजून  वृध्दिंगत करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करत आहे. तसेच गरीब व्यक्तीला मदत करेल, भुकेल्यांना अन्न देईल.

अभिलेष बडगुजर

आपल्याला जे करायचं असतं त्याला संकल्पाच  नाव न देता आपली समाजाप्रती जी कृतज्ञता आहे. त्याची जाणीव करून घेतली पाहिजे व विविध समाज घटकांप्रती जेव्हा ही संधी भेटेल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरवले आहे. मी संकल्प केला आहे तो म्हणजे घरी आहे तोपर्यंत कुणालाही घराबाहेर पडू देणार नाही. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

गौरव चौधरी

व्यायामाचे अन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता. मी रोज सकाळी माझी  सूर्यनमस्काराची सवय जोपासत रोज योगा करण्याचा निश्चय केला आहे. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे कोरोनासारख्या आजारांवर मात करता येईल यासाठी मी प्रयत्न करेल.

ज्योत्सना बेळगांवकर

नवीन वर्ष अनेक चांगल्या गोष्टी सोबत घेऊन येतं. तर मी देखील महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक किल्ले सफर करण्याचा व ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा  निर्धार केला आहे. साथीच्या आजारांवर जनजागृती करणार आहे.

राहुल पाटील

सध्या भारतच नाही तर सर्वच देश महामारीच्या उंबरठ्यावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर हे करोनाचं संकट लवकरात लवकत टळो हीच मनोकामना आहे. त्यासाठी पुढील काही दिवस घरातच राहुल माझी वाचनाची आवड जोपासेल.व सर्व सरकारी कर्मचारी वर्गास इतरत्र कुठेही न फिरता साहाय्य देईल.

तेजस चांदवडकर

- Advertisment -

ताज्या बातम्या