राष्ट्रीय स्पर्धेत नाशिककर पूनम सोनुनेचे दुसरे पदक; ५ हजार मीटरमध्ये मिळवले कांस्यपदक
Share

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकची धावपटू पूनम सोनुने हिने तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाई येथे झालेल्या अँथलेटीक १७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असतानाच ५ हजार मीटरमध्ये तिने कांस्यपदक मिळवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाई येथे फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कनिष्ट अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आल्या.
यामध्ये मंगळवारी (दि. २४) झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या पुनमने सुवर्ण पदक पटकावले. तर तिने तीन हजार मीटरचे अंतर ९ मिनीट ५२ सेकंदात पूर्ण केले होते.
तर आज झालेल्या ५ हजार मीटर गटात तिने कांस्य पदकाची कमाई केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिने हे अंतर १७ मिनिटे २३ सेकंदात पार केले. पूनम सध्या विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.