Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महाजनादेश यात्रेमुळे वाहतूक कोंडी; नाशिककरांचे हाल

Share

नाशिक | प्रतिनिधी 

भाजपची महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये आली. पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक मार्गे यात्रा त्र्यंबक नाक्यावरून मेनरोडने पंचवटी कारंजा परिसरात दाखल झाली. आजच्या महाजानदेश यात्रेमुळे अनेक ठिकाणचे रस्ते दुपारनंतर बंद करण्यात आले. बससेवा कोलमडल्याने रिक्षाचालकांची चांदी झाली. अव्वाच्या सव्वा दर आकारून रिक्षाचालकांनी नाशिककरांना अक्षरश: लुटलेच.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. यामुळे परिसरात मोठा वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नाशिककरांनी आजच्या या भाजपच्या यात्रेने झालेल्या अडचणी, उडालेली तारांबळ देशदूत डिजिटलला बोलून दाखवली.

महाजनादेश यात्रा नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर अचानक पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे मोठी तारांबळ उडालेली दिसून आली. नाशिकमधील अनेक कंपन्यांचे इनऑऊट सुरु आहे. बेरोजगारी वाढली आहे. तरीदेखील सत्ताधारी भाजप कुठलीही तमा न बाळगता पाण्यासारखा पैसा शक्तीप्रदर्शनात ओतत असल्याचे सांगत नाशिककरांनी आजच्या भाजपच्या शक्तीप्रदर्शनावर सपशेल नाराजी व्यक्त केली.


एका व्यक्तीसाठी किंवा पक्षासाठी अर्ध्या तास अगोदार वाहतूक बंद करणे चुकीचे आहे. वाहतूक वळवल्याने लांबच्या रस्त्यांनी घरी जावं लागतं आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने कॉलेज मधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

सुरेश निळे.


हॉस्पिटल मधून घरी जायला निघालो मात्र रस्ता सगळीकडून बंद केल्याने बराच वेळ थांबून राहावे लागत आहे, किती वेळ थांबावे लागेल हे पोलीस सांगत नसल्याने अडचण झाली आहे.

सुरेश मोरे


प्रचारासाठी अश्या मार्गाचा वापर करून नागरिकांना त्रास देणे हे अत्यंत चुकीचे आहे. या मुळे अनेक नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने संकटाना सामोरे जावे लागत आहे.

ओंकार शिंदे, 


संकलन : मानसी खैरनार, अनिल पाटणकर, गुंजन दुसानिस, श्वेता खोडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!