Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिककर भारत सोनवणेने जिंकली पुणे-बारामती सायकलिंग स्पर्धा

Share
नाशिक | प्रतिनिधी 
शनिवारी (दि. २०) बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेत नाशिकचा सायकलपटू भारत सोनवणे याने पहिला क्रमांक पटकावला. खुल्या गटाच्या सासवड ते बारामती अशा ८५ किमी अंतराच्या एमटीबी रेस मध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यात त्याने २ तास ३५ मिनिटे आणि १५ सेकंद अशी वेळ नोंदवत सांगलीच्या सागर यामाडे याला (२ तास ३८ मिनिटे आणि ४२ सेकंद) मागे टाकले.
या स्पर्धेसाठी नाशिक येथून ६ सायकलपटूनी नोंदणी करत स्पर्धेत उतरले होते. नाशिकच्या संघात भारत सोनवणे, निखिल भावसार, शुभम पवार, रवींद्र भदाणे यांनी एमटीबी प्रकारात तर मनोज महाले व निसर्ग भामरे यांनी पुणे-बारामती १२० रोड रेसमध्ये सहभाग घेतला होता. सर्वच सहभागी सायकलपटूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकलपटूंसोबत स्पर्धा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली.
या खेळाडूंना नाशिकमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर शेट्टी यांचे प्रशिक्षण लाभले आणि नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव नितीन नागरे व अॅड. योगेश टिळे यांचे सहकार्य लाभले. सर्व सायकलपटूंना पुढील स्पर्धांसाठी नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेतर्फे सदिच्छा देण्यात आल्या.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!