Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोना संकट : रक्तदानासाठी नाशिककर सरसावले

करोना संकट : रक्तदानासाठी नाशिककर सरसावले

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटाविरुध्द नाशिककर एकवटले आहे. रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता लक्षात घेता रक्त पेढयांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास नाशिककरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला आहे. एकट्या जनकल्याण रक्त पेढीत हजारहून अधिक दात्यांनी रक्तदान करुन संकटात माणुसकी हा एकमेव धर्म असतो हा संदेश दिला आहे.

- Advertisement -

राज्यात आठ दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध असून पुढील काळात मोठया प्रमाणात रक्ताची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. करोना युध्दाशी लढतांना रक्ताची गरज लागणार आहे.

ते बघता दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. नाशिकमध्येही रक्तदाते रक्तदानासाठी सरसावले आहे. जनकल्याण रक्तपेढीमध्ये एक हजारहून अधिक दात्यांनी रक्तदान केले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेले गर्दी टाळण्याचे आवाहन लक्षात घेता जनकल्याण रक्त पेढिकडून वेबसाईट उपलब्ध करुन दिली होती.

त्यावर संपर्क करुन नागरीक रक्तदान येत होते. त्यामाध्यमातून रक्तदानासाठी होणारी गर्दी टाळून सोशल  डिस्टन्सी नियमाचे पालन करण्यात आले. रक्तदानात तरुणांसह ज्येष्ठ नारिकांनी देखील सहभागी झाले होते. एक महिना पुरेल इतके रक्त संकलन रक्तपेढीत झाले आहे. वेबसाईटवर दात्यांची नोंद करण्यात आली असून आवश्यकतेनूसार रक्तदानासाठी त्यांना बोलविण्यात येईल.

करोना संकटात रक्ताची गरज भासणार आहे. जनकल्याण रक्तपेढीत एक हजारहून अधिक दात्यांनी रक्तदान केले आहे. गर्दी टाळण्यासाठी वेबसाईटची लिंक देण्यात आली असून नागरीक त्यावर नावनोंदणी करु शकतात.

– विनय शौचे, जनकल्याण रक्तपेढी

- Advertisment -

ताज्या बातम्या