आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नाशिककर सज्ज

0

नाशिक, ता. २० : उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसाधनांचे प्रदर्शन करून लोकांना आरोग्यदायी संदेश देण्यासाठी नाशिककर योगसाधक सज्ज झाले आहेत.

आज विविध महाविद्यालये, योगा वर्ग येथे उद्याच्या योग दिनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके घेण्यात आली.

योगामुळे शरीरासोबत मनाचाही विकास घडत असल्याने अलिकडच्या काही वर्षात शहरातील अनेकजण योगाभ्यासाकडे वळले आहेत.

LEAVE A REPLY

*