नाशिक : राष्ट्रीय नेमबाजीत दिव्यांग अनन्या ची सुवर्णसह रौप्य पदकावर मोहोर

नाशिक : राष्ट्रीय नेमबाजीत दिव्यांग अनन्या ची सुवर्णसह रौप्य पदकावर मोहोर

नाशिक | प्रतिनिधी 

मध्यप्रदेशमधील 63 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्य पद स्पर्धेत नाशिकची दिव्यांग अनन्या बत्रा या युवा खेळाडूने एअर पिस्तूल या प्रकारात कनिष्ठ व युवा गटात रौप्य व सुवर्ण पदक प्राप्त केले. या स्पर्धा 7 डिसेंबर पासून सुरु असून 4 जानेवारी 2020 पर्यंत आहेत.

अनन्या मागील 5 वर्षांपासून दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकत आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील ती एकमेव दिव्यांग खेळाडू असून तिने राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले आहे.

या वर्षीचे 2 पदकं मिळून तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत 10 पदकं जिंकली आहेत. अनन्या फ्रावशी इंटरनॅशनल या शाळेची 12 वीची विद्यार्थिनी असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गोर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ती एक्स एल टार्गेट शूटरस असोसिएशन येथे सराव करते.

शाळेकडून मिळालेल्या सहकार्यामुळे तिला स्पोर्ट्स करणे शक्य झाले. तिच्या अडचणींवर मात करत ती नेमबाजी शिकली व यश मिळवले. ती इतर सामान्य मुलांसोबत त्यांच्या कॅटेगरी मध्ये भारतीय नेमबाजी संघाच्या निवड चाचणी साठी सुद्धा पात्र असून त्या निवड चाचण्या ती देते.

अनेक शस्त्रक्रियांना सामोरे जात ती आज उभी राहू शकते व चालू शकते आहे.  तिच्या यशाचे श्रेय ती प्रशिक्षक मोनाली गोर्हे यांना देते. तिला मानसिकरित्या ,शारीरिक रित्या वेगळ्या पद्ध्तीने तयार होण्यासाठी मोठा पाठींबा गरजेचा होता आणि तो तिला त्यांच्याच माध्यमातून लाभला आहे. संस्थेच्या अध्यक्षा शर्वरी लथ, उपाध्यक्ष डॉ प्रदीप पवार, शशिकांत पारख व इतर संचालकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com