नाशिकच्या ज्योती चव्हाण यांचे पोस्टरमेकिंग स्पर्धेत यश

0

नाशिक | विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ आयोजित पोस्टरमेकिंग स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात नाशिकच्या ज्योती चव्हाण चिडे यांनी प्रथम पारितोषिक मिळवत यश संपादन केले.

या स्पर्धा दरवर्षी घेण्यात येतात. यात सहभागी होण्यासाठी धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, परभणी, मुंबई, पुणे येथून स्पर्धक आलेले होते.
राज्यस्तरिय स्पर्धेत पाञ ठरण्यासाठी स्पर्धकाला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यात प्रथम विभागीय स्तरावर प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थीची निवड केली जाते. त्यानंतर केंद्रीय स्तरावर पुन्हा स्पर्धाचे आयोजन करून त्यातून एका स्पर्धकाची राज्यस्तरिय इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड केली जाते.
राज्यस्तरीय स्पर्धा परभणी येथे होणार असुन विविध विद्यापिठाचा यात सहभाग असणार आहे. २०१० चा महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार ही चव्हाण यांना प्राप्त झाला होता.
मुक्त विद्यापिठात 31 आँक्टोबर 2017 रोजी पार पडलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात अनेक जिल्हाच्या विद्यार्थ्याबरोबरच त्यांचे प्रशिक्षक ही उपस्थित होते.
संपुर्ण दिवसभरात अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असुन सायंकाळी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कुलगुरू डाँ इ.वायुनंदन, अभिनेञी नेहा जोशी, कुलसचिव डाँ दिनेश भोंडे, विद्यापिठ  वित्त अधिकारी एम. बी पाटील, विद्यार्थी कल्याण समिती पक्ष प्रमुख विजया पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*