Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुढील दोन महिन्यात १००% पावसाची शक्यता; मराठवाड्यास दिलासा मिळणार

Share

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढील दोन महिने देखील दमदार बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदाचा मान्सूनचे दोन महिने संपले असले तरी राज्यात जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणे ओव्हरफ्लो होण्याचा मार्गावर आहेत. दरम्यान जिल्ह्यातील गंगापूर, नांदुरमाध्यमेश्वर, हतनूर, दारणा या धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग देखील वाढविण्यात आला आहे.

जून आणि जूलै महिन्यात दमदार पावसाची बरसात झाल्यानंतर पुढील दोन महिने सामान्य पाऊस पडणार आहे. आगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात भारतात १००% पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकर्‍यांसाठी ही बातमी मोठी दिलासादायक ठरणार आहे. परंतु यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर मराठवाड्यासारख्या ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे येणारा पाऊस काही ठिकाणी लाभदायक तर काहींना धोकादायक ठरणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रामध्येही पावसाने यंदा दमदार बरसात केली आहे. मुंबईत जून, जुलै महिन्यात अवघ्या सात दिवसांच्या पावसामुळे विक्रमी पावसाची नोंद केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळ्याच्या दुसर्‍या टप्प्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात देशात ९९ टक्के पावसाची शक्यता आहे़.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!