Type to search

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राला भेट

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राला भेट

Share

त्र्यंबकेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात आले असता त्यांनी स्वामी समर्थ गुुरुपीठ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी येथील सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे करीत असलेले सेवा कार्य समाज व राष्ट्रहिताचे असून आजच्या श्री गुरुपीठ भेटीत हे कार्य जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांनी गुरुपीठ परिसरात सुरु असलेल्या विविध उपक्रम व विभागांना भेट दिली असता त्यांनी हे मत व्यक्त केले.

या प्रसंगी मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गिरीश महाजन, खा.हेमंत गोडसे, खा. भारती पवार, आ. सिमा हिरे, आ.देवयानी फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुपीठाच्या परिसराबद्दल तसेच येथील आध्यात्मिक, समाज व राष्ट्रोपयोगी कार्याची माहिती अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!