Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने सीबीएस समोर अपघात

Share

नाशिक। एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बसची पुढे चाललेल्या चारचाकी वाहनास धडक बसली, तर चारचाकी वाहन पुढे चालणार्‍या पोलीस व्हॅनवर जाऊन आदळले.आज (ता.23) सकाळी हा प्रकार घडला. या विचित्र अपघातात कोणतीही जीवीत हाणी झाली नाही.

त्र्यंबक नाक्याकडून सीबीएसमार्गे पंचवटीकडे जाणार्‍या शहर बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे धावती बस समोरील महिंद्रा कारवर पाठीमागून जाऊन धडकली. तर महिंद्रा कार तिच्यापुढील पोलीस गाडीवर जाऊन धडकली. यात तीनही वाहनांचे नुकसान झाले असून याप्रकरणी बसचालकाविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसचालक सुभाष रामू देवकर यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रवींद्र सूर्यकांत पाटील (रा. गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते त्र्यंबक नाक्याकडून सीबीएस मार्गे अशोकस्तंभाकडे जात होते.

त्यावेळी परिवहन महामंडळाची शहर बस (एमएच 40 एन 9415) पाठीमागून वेगात आली बसने पाटील यांच्या महिंद्रा कारला (एमएच 15 इएच 7879) पाठीमागून धडक दिली. बसच्या जोरदार धडकेमुळे त्यांची कार आणखी वेगात पुढे गेली आणि त्यांच्या कारसमोर चाललेल्या पोलीस श्वॉन पथकाच्या वाहनावर (एमएच 15 एबी 116) पाठीमागून जाऊन धडकली.

या विचित्र अपघातामध्ये पाठीमागून धडकलेली शहर बस आणि पुढील शासकीय वाहन या दोन वाहनांच्यामध्ये त्यांची महिंद्रा कार सापडल्याने तिचे नुकसान झाले आहे. सदरील बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे सदरचा अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी सातभाई हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!