नववर्षस्वागत; “शान” च्या किरणांनी गरजूंना मदतीचा प्रकाश

0
चांदवड – नववर्षाच्या स्वागत कुणी पार्ट्या झोडून तर कुणी नाच गाणे करून केले मात्र, चांदवड तालुक्यातील शान इन्फोटेक या संस्थेने देवी हट्टी येथील आदिवासी पाड्यावर जात वंचीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत नवीन वर्षाचे सकारात्मक ऊर्जेने स्वागत केले.

शान इन्फोटेक हि संस्था दरवर्षी नववर्षाचे स्वागत अभिनव उपक्रम राबवत करत असते, हा शिरस्ता त्यांनी यंदाही कायम ठेवला असून चांदवड परिसरातील देवी हट्टी या आदिवासी पाड्यावर जात तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. हा अभिनव व सकारात्मक ऊर्जेने पार पडलेला उपक्रम हजारो रूपये खर्च करत मद्यपान व बिभीस्त नाच गाणी करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.

या पाड्यावरील बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक काबाड कष्ट करणारे असून शिक्षणाच्या महत्वापासून काहीसे दूर आहेत त्यामुळेच विकास काळे यांनी त्यांचे देखील शिक्षणाप्रती प्रबोधन करत पालकांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन निर्माण केला, हा दृष्टिकोन शाळाबाह्य मुलांची गळती भरू काढणारा ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी शान इन्फोटेकचे संचालक विकास काळे, माधवी काळे, सुनील जाधव, निलोफर तांबोळी, अनिता गोसावी, अमोल भवर, विशाल शिंदे, कृष्णा गांगुर्डे, जितेंद्र परदेशी, मेघा जाधव, वैशाली निकम, उज्जला पवार, छाया छोटमळ आदी उपस्थित होते.

शिक्षनाप्रति विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी त्याशिवाय कोवळ्या मनावर समाजकार्याचे शब्द आयुष्यभर कोरले जावेत या भावनेतून आम्ही दरवर्षी आमच्या संस्थेमार्फत असे उपक्रम राबवत असतो, यातून मानसिक समाधान तर मिळतेच याशिवाय वंचीताना देखील गरजेचे साहित्य मिळते.

– विकास काळे, संचालक शान इन्फोटेक

LEAVE A REPLY

*