Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा परिषदेची पीएमएस प्रणाली राज्यभर राबवणार

Share

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात बांधकाम विभाग,लघु पाटबंधारे विभाग तसेच पाणीपुरवठा विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पी.एम.एस.)प्रणाली सर्व जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला.ग्रामविकास विभागाने याबाबत शासन निर्णय काढून या प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक स्वरुपात ही प्रणाली राबवण्यात येत असून त्याची उपयुक्तता व यशस्वीपणे करण्यात असलेली अंमलबजावणी यामुळे शासनाने ही योजना सर्व जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

राज्याने या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्याची निवड केली होती.त्यानुसार जिल्ह्यात प्रायोगित तत्त्वावर अंगणवाडींच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.शासनाने यासाठी सीडॅक या शासकीय संस्थेची निवड केली असून या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदांमध्ये ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.

या प्रणालीबाबत नाशिक जिल्ह्यात बांधकाम विभाग,लघु पाटबंधारे विभाग,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यातील कार्यकारी अभियंता,उप अभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.याच प्रकारचे प्रशिक्षण आता सर्व जिल्ह्यात देण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबवताना येणार्‍या विविध अडचणींबाबत तसेच अन्य बदलांबाबत नाशिक जिल्ह्याने ग्रामविकास विभागास प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावानुसार शासनाने नाशिक जिल्ह्यांच्या सूचनांनुसार आवश्यक बदल करून ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिममधील संगणीकृत पद्धतीने राबविण्यास मान्यता दिली होती.

या सिस्टिममध्ये कोणत्या अभियंत्याने माहिती भरली त्याची माहिती समाविष्ट करणे, संबंधित अभियंत्याने माहिती भरल्यावर त्याची प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेत चिटकविणे, त्यानंतर शाईने प्रिंट आऊटवर चारही बाजूने तिरप्या रेषा मारुन साक्षांकित करणे, प्रत्येक पानावर अभियंत्याने स्वाक्षरी करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो सर्वप्रथम सिस्टिमवरच करावा शाईने करु नये अशाही सुचना शासनाने दिल्या आहेत. या प्रणालीमुळे कामात पारदर्शकता येत असून विविध कामांची मोजमाप पुस्तिका नोंदविणे, देयके नोंदविणे आदि कामे करणे सुलभ झाले आहे.

तसेच हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार असून विविध फाईलींचा प्रवास यामुळे थांबणार असून विनाविलंब देयक अदा करता येणार असल्याची माहिती डॉ. नरेश गिते यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!