Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

116 शिक्षकांची पदस्थापना रखडली; जिल्हा परिषद : ऑनलाईन शिक्षक बदल्या

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा परिषद ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत विस्थापीत होणार्‍या शिक्षकांची यादी मिळत नसल्याने आतंरजिल्हा बदलीने जिल्हयात आलेल्या 116 शिक्षकांची पदस्थापना रखडली आहे. विस्थापीत शिक्षक व आतंरजिल्हा शिक्षकांची पदस्थापना एकाचवेळी समुपदेशन पध्दतीने केली जाणार आहे. त्यामुळे विस्थापीत शिक्षक यादीची प्रतिक्षा विभागाला आहे.

जिल्हा परिषदेच्या बदली पात्र 1 हजार 388 शिक्षकांची ऑनलाईन बदल्या झाल्या असून त्यांना आदेश प्राप्त झाले आहे.शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मागील वर्षापासून शासनाने ऑनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला. मागील आठवडयात ऑनलाईन प्रणालीव्दारे जिल्हयातील मराठी माध्यमातील 1 हजार 373 तर उर्दु माध्यमातील 15 अशा एकुण 1 हजार 388 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामध्ये विशेष संवर्ग 1 मधील 231, विशेष संवर्ग 2 मधील 218, बदली अधिकार प्राप्त संवर्गातील 148 व बदली पात्र संवर्गातील 791 शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. साधारण : दोन हजार 300 शिक्षकांनी बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज केले होते यापैकी 1 हजार 388 शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहे. या बदली प्रक्रीयेत शिक्षक विस्थापीत होतात. या विस्थापीत झालेल्या शिक्षकांची यादी शासनाकडून प्राप्त होते.

मात्र, बदल्या होऊन चार दिवसांचा कालावधी उलटूनही ही यादी प्राप्त झालेली नाही. विस्थापीत शिक्षकांची यादी प्राप्त होत नसल्याकारणाने, आतंरजिल्हा बदल्या होऊन आलेल्या शिक्षकांच्या पदस्थापनाही रखडल्या आहे. विस्थापीत व आतंरजिल्हा बदली शिक्षकांना एकाचवेळी पदस्थापना देण्यात याव्यात असा शासन आदेश आहे.

त्यामुळे आतंरजिल्हा बदलीने जिल्हयात हजर झालेले 116 शिक्षकांना पदस्थापना मिळालेली नाही. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाले मात्र, शिक्षकांच्या पदस्थापना नसल्याने अनेक शाळांना शिक्षक नाही असे चित्र आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!