Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जि.प.विभाग : फाईल निपटर्‍यासाठी सात दिवसांचा अल्टीमेटम

Share

नाशिक । प्रतिनिधी
विभागप्रमुखांच्या बोलाविण्यात आलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत अनेक विभागात मोठया प्रमाणात फाईल पेंडन्सी असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या निदर्शनास आले.यावर सांगळे यांनी सर्व विभागप्रमुखांना फाईलींचा निपटरा करण्यासाठी सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.प्राप्त झालेल्या निधीचे व 2019-20 चे निधीचे तात्काळ नियोजन करण्याचे सूचनाही अध्यक्षांनी यावेळी दिल्या.

जि.प.विभागप्रमुखांची सोमवारी (दि.24) अध्यक्षा सांगळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला,सेस व 2019-20 च्या मंजूर नियतव्यचा नियोजनाचा अध्यक्षा सांगळे यांनी योजनानिहाय आढावा घेतला.
यवेळी महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा निधी नियोजन झालेले नसल्याचे समोर आले.

महिला व बालकल्याण विभागातील अनेक योजनांचा निधी अखर्चित आहे. या विभागातील 50 टक्के प्रशिक्षणासाठी असलेल्या योजनांना प्रतिसाद मिळत नसल्याने या योजना बदलाबाबत चर्चा झाली. सदर योजना बदलाचा विषय सर्वसधारण सभेवर ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शिक्षण विभागातंर्गत शाळा, वर्ग खोल्या दुरूस्ती निधी नियोजबाबतही अध्यक्षा सांगळे यांनी विचारणा केली. नियोजन झाले असून, सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आढाव्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह अनेक विभागातील फाईल पेंडन्सी असल्याचे समोर आले. यावेळी विभागप्रमुख एकमेकांवर ढकला-ढकली करत होते. त्यावर अध्यक्षा सांगळे यांनी अधिकार्‍यांची कानउघडणी केली. सर्वच विभागातील फाईली तात्काळ निकाली काढा असे आदेश अध्यक्षा सांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना दिले.तसेच पेंडीग फाईलचा अहवालही त्यांनी मागितला आहे.

खातेप्रमुखांना ताकीद

पेडींग फाईलींचा निपटरा पुढील आठवडयातील सोमवारपर्यंत केलाच पहिजे. एकही फाईल राहता कामा नये,अशी ताकीद अध्यक्षा सांगळे यांनी यावेळी दिली. बैठकीत डॉ. गिते यांसह विभागप्रमुख उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!