Type to search

आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने मिनिमंत्रालय गजबजणार

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने मिनिमंत्रालय गजबजणार

Share

नाशिक । 
राजकीय उत्सव समजल्या जाणार्‍या देशातील लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता तब्बल 78 दिवसांनंतर रविवारी(दि.26) रात्री उशिरा संपल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.त्यामुळे अडीच महिन्यांपासून ठप्प झालेल्या विकास कामांना आजपासून चालना मिळणार आहे.यामुळे जिल्हा परिषद ,पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आता पुन्हा रुळावर येणार आहे.

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी दि.10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आणि तेव्हापासून आदर्श आचारसंहितेचे पालन देशभर सुरू झाले. सात टप्प्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडून मतमोजणीही पूर्ण झाली आहे.

आदर्श आचारसंहिता देशभर तब्बल 78 दिवस लागू होती.निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यामुळे रविवारी देशभर लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर केले.त्यामुळे उद्या(दि27)पासून आचारसंहितेचा फटका कुठल्याही कामाला बसणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

आदर्श आचारसंहिता असल्यामुळे पाणी टंचाईची कामे वगळता रस्ते,पाझरतलाव,वैयक्तिक लाभाच्या योजना अशी सर्वच कामे तब्बल अडीच महिने अडकून पडली होती.विविध विकास कामांच्या जाहीर निविदाही या काळात जाहीर करता आल्या नाहीत.त्यांचाही मार्ग आता त्यामुळे मोकळा होणार आहे. उद्यापासून जिल्हा परिषद,पंचायत समित्या व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाजाला प्रारंभ होऊन सर्वसामान्यांचीही वर्दळ येथे वाढण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!