Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेत कार्यालयीन वेळेत चाले भिशीचा खेळ

Share
नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध विभागांचा कार्यभार ज्यांच्या खांद्यावर आहे असे जिल्हा परिषद सेवक कार्यालयीन वेळेत भिश्शी चालवत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयातील ग्रामपंचायत विभागात बुधवारी सायंकाळी येथील सेवकांनी एकत्र येत हा चिठ्ठीचा खेळ मांडल्याचे उघडकीस आले.
विशेष म्हणजे या विभागाचे प्रभारी प्रमुख इशाधिन शेळकंदे हे कार्यालयात हजर असताना त्यांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आले. त्यामुळे विभागप्रमुखांचे अशा गोष्टींना अभय मिळणार असेल तर हे सेवक इतरांना काय जुमान तील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेत कामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकार्‍ यांची धावपळ  असते. सदस्यांना कामे घेवून जाताना अधिकारी वेळेवर भेटत नाहीत. भेटले तरी काम होईलच याची शाश्वती नाही .त्यामुळे वेळेत कामे होण्यासाठी अनेकदा सेेवक नसल्याचे सांगितले जाते. त्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याकडे विभागप्रमुखांचा आग्रह असतो.
संकटसमयी सेवकांची बाजू सांभाळण्याचे काम विभाग प्रमुख करतात. त्यामुळे सेवक झाकले जातात. मात्र, ग्राम पंचायत सारख्या अत्यंत वर्दळीच्या विभागातील सेवक वेगळ्याच मार्गाला लगले आहेत. कार्यालयीन वेळेत हजर असलेले सेेवक बुधवारी एकत्र आले आणि त्यांनी थेट एका टेबलवर भिश्शीचा खेळ सुरु केला.
एका बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकून ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. सर्वांनी जमा केलेले पैसे एका लकी सेवकाला देण्यात आले. या प्रकरणाविषयी आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे ग्राम पंचायत विभागात कार्यालयीन वेळेत हा सर्व प्रकार हा विभागाचे प्रमुख इशाधिन शेळकंदे यांच्या कार्यालयासमोर सुरु होता.
सेवकांनी याची तमा न बाळगता ही सोडत काढली. विभाग प्रमुखांचे अशा गोष्टींना अभय मिळत असेल तर सर्वसामान्य नागरीकांचे कामे होतीलच याची शाश्वती काय? असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला.
मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी एक अत्यंत महत्वाचे काम सांगीतलेले असल्यामुळे आता बोलण्यासाठी वेळ नाही. काही विषय असेल तर उद्या  सविस्तरपणे बोलू.
– इशाधिन शेळकंदे (प्र.विभागप्रमुख ग्रामपंचायत विभाग)
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!