Type to search

शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन

नाशिक

शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन

Share

येवला : महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुदानावर शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान तत्वावर अर्ज मागवण्यात येत आहे तरी इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत असे आवाहन जि प सदस्य संजय बनकर व पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी केले आहे

या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदानावर शेळी गट (१०+१) अनुदान ४३९२८ व मांसल पक्षी १००० पक्षांच्या पोल्ट्री शेडचे बांधकाम करण्यासाठी ११२५०० तर दुधाळ गाय म्हैस गट वाटप यासाठी ४२५३१ इतके अनुदान मिळणार आहे तर विशेष घटक प्रवर्गाकरिता ७५ टक्के अनुदानावर शेळी गट १०+१ अनुदान ६५८९३, पोल्ट्री शेड (१०००पक्षी) बांधकामासाठी १६८७५० तर दुधाळ गाय,म्हैस गट वाटपासाठी ६३७८५ इतके अनुदान मिळणार आहे.

याव्यतिरिक्त आदिवासी उपयोजना अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर वरील सर्व योजना लागू असून या योजनांचा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर अशी असून त्यासाठी http:/ah.mahabms.com या संकेत स्थळावर मुदतीत अर्ज दाखल करावे या योजनेसाठी लाभार्थी निवड लकी ड्रॉ पद्धतीने जिल्हास्तरावर होणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे अपलोड करावे लागणार नाहीत व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन कार्यालय पंचायत समिती येवला अथवा नजीकच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!