Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जि.प. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित

Share
जि. प. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या रद्द होणार; मंगळवारी नाशिकला विभागीय बैठक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.१९) आरक्षण सोडत जाहिर झाली असुन पुढिल अडिच वर्षासाठि हे पद खुल्या प्रर्वगासाठि आरक्षित असणार आहे.

मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद आरक्षण सोडतीकडे जिल्हयाचे लक्ष लागून होते. खुल्या गटासाठि आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या आशा बळावल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीआरक्षण सर्वसाधारण असून फिरत्या आरक्षण पद्धतीनुसार येणारा अध्यक्ष सर्वसाधारण प्रवर्गातून होणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर पुढील राजकीय समीकरणे लवकरच ठरणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात येत असताना राज्य सरकारने चार महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे नवीन अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची निवड २१ जानेवारीला होणार की तत्पूर्वीच याकडेही लक्ष लागले आहे.


राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत 

  • अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
  • अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
  • अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
  • अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
  • खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
  • खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

असा आहे कार्यक्रम

तारीख                         कार्यक्रम
22 नोव्हेंबर              अधिसूचना प्रसिद्ध
22 ते 27 नोव्हेंबर      उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
28 नोव्हेंबर              अर्ज छाननी
4 डिसेंबर                 (जेथे अपील नाही) अर्ज माघारी घेण्याची मुदत
7 डिसेंबर                 (जेथे अपील आहे) अर्ज माघारी घेण्याची मुदत
12 डिसेंबर               मतदान
13 डिसेंबर               मतमोजणी

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!