जि. प.च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे उद्या वितरण

0

नाशिक | जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणास अखेर मुहूर्त सापडला असून मागील वर्षाचे शिल्लक व रखडलेले पुरस्कार व सन 2017-18 चे पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि.5) शिक्षक दिनी सकाळी 11 वाजता येथील प सा नाट्यगृह करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून पुरस्कारांची निवड उद्या सायंकाळी जाहीर होईल. गतवर्षी कळवण तालुक्यातील एका शिक्षकास पुरस्कार देण्यावरून वादंग झाल्यामुळे संपूर्ण पुरस्कार वितरण रखडले होते. त्यावरही यावर्षी एकमत झाल्याने मागील वर्षाचे रखडलेले पुरस्कारांंसह यावर्षीच्या म्हणजेच सन 2017-18 च्या पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत तर शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष नयना गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांंडगे, समिती सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*