Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक निकालाचं आज दहावं…तरी सुद्धा कावळा शिवेना; सोशल मिडीयावर ‘मिम्स’चा पाऊस

Share

नाशिक : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज दहा दिवस होत आलेत तरी देखील अद्याप मुख्यमंत्री पदावरून शिवसेना -भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. यावरून सोशल मीडियात जोरदार मिम्स व संदेश व्हायरल होत असून निवडणूक निकालाचं आज दहावं…तरी सुद्धा कावळा शिवेना; सगळ्यांनी आपापले फोन चालू ठेवा , कोणत्याही क्षणी आपल्यास मुख्यमंत्री पदासाठी कॉल येऊ शकतो.’ अशा प्रकारचे अनेक मॅसेज व मिम्स व्हायरल होत आहेत.

निकाल लागल्यानंतर युतीमध्ये ‘मुख्यमंत्री कोणाचा’ यावरून चांगलाच वाद रंगला असून निकालाच्या दहाव्या दिवशी देखील हा तिढा सुटल्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे राज्याचे राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून रंगलेल्या चढाओढीची नेटकऱ्यांनी तुफान खिल्ली उडवली आहे. यामध्ये वेगवगेळ्या टॅगलाईन वापरून तसेच फोटो एडिट करून या मिम्स व्हायरल केल्या जात आहेत.

दरम्यान सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भाजपवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. तर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईल’ या वाक्यावरून नेटकऱ्यानी खिल्ली उडविली आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचाही कार्यकाळ अवघ्या दोन ते तीन दिवस उरला असतांना अद्यापही मुख्यमंत्री पदाचा घोळ सुरूच असल्याने महाराष्ट्रातील जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमातून युतीला चांगलेच धारेवर धरले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!