Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

युतीच्या उमेदवाराला बंडखोरीचा फटका; शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Share

नाशिक : शहरात शिवसेनेला एकही जागा नसल्याने या ठिकाणी भाजपने अधिकृत उमेदवार उभे करीत शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु नाशिक पश्चिम मधून शिवसेनेचे विलास शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करत असून यामुळे या मतदारसंघात युतीचा तिढा वाढणार असल्याची शक्यता आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शनही होताना दिसून येत आहे.

दरम्यान राज्यात भाजप आणि शिवसेनची युती झाली असली तरी शहरात मात्र शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. परिणामी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन होत आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात युतीच्या विद्यमान आमदार सीमा हिरे उमेदवार असतांना शिवसेनेकडून बंडखोरीची शक्यता असून शिवसेनेचे विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे यांच्या पैकी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भाजपने दिलेल्या उमेदवार दिल्याने स्थानिक मतदारसंघातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे शिवसैनिक एकवटले असून आज नाशिक पश्चिममधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विलास शिंदे यांनी सर्मथकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता नाशिक पश्चिम यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!