Type to search

नाशिक

युगांत फाउंडेशनतर्फे ५६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Share

नाशिक येथील युगांत फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दुर्गम भागातील जि.प. शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जि. प. शाळा वनारवाडी, करंजाळी पाडा, देवसाने, शिंदपाडा, मोरवनपाडा, रानपाडा, चारणवाडी, सारसाळे, करंजाळी गावठा या दिंडोरी तालुक्यातील तसेच कळवण तालुक्यातील बेटकीपाडा या एकूण १० शाळांमधील ५६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

युगांत फाउंडेशन मागील दहा वर्षांपासून “झेप” उपक्रमांतर्गत शालेय साहित्य वाटप करत आहे. युगांत ने आजपर्यंत ५९०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप केलं आहे.

या प्रसंगी वनारवाडी शाळेस ( टी. व्ही.) दूरदर्शन संचाचे हस्तांतरण करण्यात आले. “झेप” २०१९ ला यशस्वी करण्यासाठी सचिव महेश गुजर, विश्वस्त  सागर  मसराणी, मेघना भटेवरा, रोहन सोमण व प्रा. प्राजक्ता देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

या वेळी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी, ग्रामस्थ, तसेच संस्थेचे पदाधिकारी प्रा. प्राजक्ता देशमुख, महेश गुजर, सुजाता काटे, यशश्री गुजर, ज्योत्स्ना कुलकर्णी, गणितमित्र वाल्मिक चव्हाण, विनीत गद्रे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!