Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : रासेगांव जवळ युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Share
चामरलेणीला युवकाचा मृतदेह आढळला latest-news-nashik-found-body-of-young-man-at-chamarleni

उमराळे : रासेगांव जवळलील बारासाखळ्या महामार्गाच्याकडे लगत पांगरीच्या झाडाला गळफास घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की नाशिक येथील फूल तांबे यांनी रासेगांव येथे जमिन घेतली. त्या ठिकाणी पेरू बागासाठी प्रशांत उर्फ समाधान साहेबराव बच्छाव (वय ३०) रा. कौळाणे ता. मालेगांव हा गेली दहा दिवसापासुन शेतात मजुरीचे काम करत होता. तो मानसिक आजाराने त्रस्त होता असे पोलीसांनी सांगितले.

या घटनेची माहीती दिडोरी उमराळे बु पोलीस स्टेशनला कळताच पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस नाईक धनंजय शिलवटे  पोह भोये पोकॉ राठोड हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. युवकाचा मृतदेह दिडोंरी येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला असुन पूढील तपास दिडोंरी पो निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!