Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवला 23 तर, नांदगावात 20 टँकर सुरू

Share

नाशिक । प्रतिनिधी
दमदार पावसामुळे जिल्ह्यातील 15 पैकी 13 तालुके टँकरमुक्त झाले असले तरी अवर्षणग्रस्त येवला व नांदगावात या तालुक्यांमध्ये अद्याप टँकर सुरू आहे. येवल्यात 23 तर नांदगावात 20 टँकरद्वारे तहान भागवली जात आहे. शासनाने दुष्काळी परिस्थिती बघता राज्यात टँकरला येत्या 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ऑगस्टच्या प्रारंभीच्या पंधरवड्यात जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. तसेच इतर तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. मागील चार महिने दुष्काळाच्या दाहाने जिल्हा होरपळून निघाला होता. धरणे जवळपास कोरडीठाक पडली होती.

नद्या, नाले, विहिरी आटल्या होंत्या. जिल्ह्यावासियांची तब्बल 393 टँकरने तहान भागविली जात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. मात्र, जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने टँकरच्या संख्येत मोठी घट झाली. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, निफाड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव, बागलाण व चांदवड ही तालुके टँकरमुक्त झाली.

दमदार पावसामुळे या तालुक्यातील जलसाठे, धरणात मुबलक पाणीसाठा झाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, येवला व नांदगाव या दोन्ही तालुक्यात अद्याप टँकर सुरु आहे. येथील वस्ती, वाड्यांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

हे दोन्ही तालुके मिळून 43 टँकर सुरू आहे. पावसाचा दीड महिन्याचा हगाम अद्याप शिल्लक आहे. पुढील काळात हे दोन्ही तालुके टँकरमुक्त होतील, अशी अपेक्षा आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!