Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवला : विखरणी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; वीजपुरवठा खंडित

Share

विखरणी । राजेंद्र शेलार : विखरणी सह कातरणी, विसापुर, देवरगाव येथे वादळासह पावसाने धुमाकूळ घातल्याने सावरगाव पाटोदा रस्त्यावर देवरगाव येथे रस्त्यावर झाडे पडली असून याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

देवरगाव येथे मोठ्या प्रमाणावर वादळ असल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडुन गेल्याने त्यांच्या डोक्यावरील छप्पर वादळाने हिरावून नेले आहे. देवरगाव येथील एक पत्र्याची टपरी काही मीटर अंतरावर उडुन येऊन पाण्याच्या टाकीला अडल्याने पुढे होणारा अनर्थ टळला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पोल मोडून पडले तर चारा उडून गेला तर काही ठिकाणी चारा पूर्णपणे पावसात भिजून गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा रहाणार आहे.

विखरणी येथील महेश बिडगर यांच्या घरापासून थोड्या अंतरावर झाडावर विज पडल्याने बिडगर कुटूंबीय थोडक्यात बचावले तर कातरणी येथे वादळाने शेतकऱ्यांचे डाळिंब बागेचे नुकसान झाले. दोन एकरात असलेल्या शेततळ्याचा कागद ७० टक्के फाटला असून त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. सावरगाव, साबरवाडी दरम्यान विजमंडळाची मेनलाईन वरील अनेक पोल पडल्याने पाटोदा विखरणी येथील उपकेंद्राच्या वीजपुरवठ्यावर पुढील काही दिवस तरी परिणाम होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!