Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवला येथे अवैध दारूच्या मुद्देमालासह एकास अटक

Share

येवला । राजेंद्र शेलार : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला मुद्देमालासह अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नगरसुलजवळ अवैध देशी दारूची वाहतूक करत असताना एमएच १२ बीपी ९९७३ क्रमांकाचे मारुती कंपनीचे वाहन व या वाहनात लपवून ठेवलेल्या ३८४ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून एकूण ८०९६८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

देशी दारूची वाहतूक करत असताना सागर सुभाष मोरे (२२) नगरसुल ता येवला या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर दारूबंदी गुन्ह्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती येवला विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस वाय श्रीवास्तव यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहळ,विभागाचे अधीक्षक मनोहर अचूळे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक पि डी कुडवे, एस एम ताकवले, व्ही व्ही डांगे, योगेश साळवे, दीपक नेमणार, अनिल जाधव, साताळकर यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास निरीक्षक एस वाय श्रीवास्तव करत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!