मनमाड येवला महामार्गावर गॅस टँकर उलटला ; ट्रक ड्रायव्हरचा धक्क्याने मृत्यू

0

राजेंद्र शेलार । येवला : मनमाड येवला महामार्गावर अनकाई बारी येथे एस टी बसला ओव्हरटेक करतांना बसला वाचवण्याच्या नादात गॅस टँकर उलटला असून टँकर मधून काही प्रमाणात गॅस गळती होत असल्याने परिसरात घबराट पसरली होती मात्र पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार येवल्याकडून मनमाडकडे जाणारा गॅस टँकर GJ 16 AU 6444 हा बाजूच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या बसचा अंदाज न आल्याने बसला वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघाताचा धक्का बसल्याने टँकर चालकाला हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर बसचा अपघात थोडक्यात टळला आहे.

बस मधील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही सदर गॅस टँकर रिकामा होता परंतु त्यात थोड्या प्रमाणात गॅस असल्याने गॅस गळती झाली. हा गॅस टँकर भरलेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती कारण येथून काही अंतरावरच पानेवाडी येथे सर्व पेट्रोल व गॅस कंपन्यांच्या टाक्या आहेत येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भापकर हे सहकार्यासह त्वरित घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तेथील बघ्यांची गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. गॅस टॅंकर रिकामा असल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

LEAVE A REPLY

*