Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : येवल्यात पावसाचे थैमान; झाडे कोसळली; अनेक घरांचे नुकसान

Share

येवला । राजेंद्र शेलार : आज दुसऱ्या दिवशीही येवल्यासह तालुक्यात वादळी पाऊस झाला असून या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे येवल्यातील चैत्यभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा दर्शवणारी मुख्य कमान कोसळली. यामुळे पुणे-इंदौर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान येवला तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून येवल्यातील चैत्यभूमी येथील कमान रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

तालुक्यातील देवदरी येथे पावसामध्ये शांताबाई दाणे याचे दोन बैल वीज पडून ठार झाले असून अनेक गावांमध्ये झाडे पडली तर येवला शहरातील मिल्लत नगर भागात घरचे पत्रे उडाले, नागड दरवाजा भागात गाडीवर झाड पडल्याने गाडीचे नुकसान झाले तर पाटोदा येथे येवला लासलगाव मार्गावर लिंबाचे झाड कोसळल्याने खंडू पवार व सुनील सोनवणे हे जखमी झाले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाटोदा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने उध्वस्त झाली. तर अनेक ठिकाणी विजेचे पोल कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तालुक्यातील अनकाई येथील बाळु जाधव यांचे घरावरील पत्रे उडाल्याने घरातील मुले जखमी झाले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचे शेड व पत्रे उडाल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!