दातांवर उपचार करायला गेला अन कानावरती उपचार करून आला

0

ममदापूर । वार्ताहर
ममदापूर येथील बापू बाबासाहेब गुडघे (२०) हा दुचाकीवरून दवाखान्यात जात असताना येवला येथील विंचूर चौफुलीवर मोटर सायकल मध्ये पतंगाचा मांजा अडकून कानाला जखम झाली. स्थानिक लोकांनी त्यास उपचारासाठी येओल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान बापू दाताच्या दवाखाण्यात निघाला असता वाटेत मांजा गाडीच्या टायरला अडकून कानाला लागल्याने जखम झाली. यावेळी दवाखान्यात त्यावर पाच टाके टाकण्यात आले. सध्या त्याची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दाता वरती उपचार करण्‍यासाठी गेलेल्या तरुणाला कानावरती उपचार करून घरी यावे लागले. त्यामुळे शासनाने नायला दौऱ्यावरील बंदी फक्त कागदोपत्रीच आहे की काय असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकांना पडत आहे.

LEAVE A REPLY

*