नटनाद ढोल ताशा पथकातर्फे 201 ध्वजांचा जागतिक विक्रम

0

नाशिक । नाशिकमध्ये सार्वजनिक उत्सवात वादन करणार्‍या नटनाद ढोल पथकाच्या वतीने आज ताशांचा थरार व ढोलचा गजर करत 201 ध्वजांचा जागतिक विक्रम करण्यात आला. नटनाद ढोल ताशा पथकाच्या वतीने नवीन आडगांव नाका मित्र मंडळ येथे आज सायंकाळी सात वाजता जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये एकाच वेळी नोंद झाली.

या पथकात वकील, शिक्षक, व्यापारी, विद्यार्थी, शासकीय उच्चपदस्थ अधिकारी यांचा समावेश आहे. ढोलताशांच्या तालावर 201 ध्वजांना 1 तास सतत नाचवून हा उपक्रम साजरा करण्यात आला. नवीन आडगांव नाका मित्र मंडळाच्या पथकाने या उपक्रमाचे आयोजन केले.

नाशिकच्या ढोल पथकाच्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी व सर्व ढोल वादक व ध्वजधारक यांचा उत्साह वाढविण्यासाठी नवीन आडगांव नाका मित्र मंडळाचे अध्यक्ष समाधन जाधव, मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह नाशिककर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*