Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : जागतिक योगदिनानिमित्त नाशकात ‘संडे योगा स्ट्रीट’ साजरा

Share

नाशिक : जगभरात २१ जून २०१९ रोजी जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने आयुष मंत्रालय मुंबई व योग विद्या गुरुकुल नाशिक यांचेमार्फत ‘संडे योगा स्ट्रीट’ हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

सर्व नागरिकांना योगाचे महत्त्व व आनंद कळण्यासाठी योगाच्या रस्त्यावर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व योगसाधक दिनांक १६ जून २०१९ रोजी रस्त्यावर येऊन योगाबद्दलचे महत्व नागरिकांना पटवून दिले आहे. हा आनंद लुटण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज सकाळी ६ ते ८ दरम्यान हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळी सहा ते आठ या वेळेत बिटको पॉइंट ते कन्या कोठारी शाळा या रस्त्यावर योगासंबंधी ची महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हजारो योगसाधक रस्त्यावर येऊन योगातील आसनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.

त्यात योगानृत्य, प्राणायामाचा अभ्यास, सूर्यनमस्काराचा अभ्यास यांचाही समावेश आहे. तसेच योगा विषयीची निरनिराळी ग्रंथसंपदा प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!