Type to search

Breaking News नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

जागतिक मुद्रण दिन : मुद्रण कला – काल, आज आणि उद्या

Share

मुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन २४ फेब्रुवारीला झाला. हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला, त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि पद्धती यामध्ये झाली आहे.

मुद्रण म्हणजे नेमकं काय ?
सामान्यतः मुद्रणाचा अर्थ छापण्याशी आहे जे आपण कागद,कपडा, किंवा प्लास्टिक इत्यादी वर छापू शकतो .पोस्टातील लिफाफे किंवा पोस्टकार्ड व रजिस्टर्ड कागदावर ज्या मोहर उठवलेल्या असतात, त्यांना सुद्धा मुद्रण असं म्हणतात ,प्रसिद्ध इंग्रजी लेखक चार्ल्स डिकॅनस याने मुद्रण कलेचे महत्व सांगताना म्हटले आहे कि स्वातंत्र्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास टिकवून ठेवण्यासाठी मुद्रण महत्वाची भूमिका पार पडत असते. प्राचीन युगामध्ये मुद्रण ही कला होती परंतु सध्याच्या आधुनिक काळामध्ये मुद्रण हे पूर्णतः तांत्रिक झाले आहे .मुद्रण ही कला पत्रकारिता क्षेत्रामध्ये वाढीस लागली,विकसित झाली आणि तांत्रिक रूपात परिवर्तित झाली आहे.

काल ची मुद्रण कला
इतिहास
01) चीन – इस,सन १०५ मध्ये चिनी नागरिक टस -तस तसाई लून याने कापसाच्या साहाय्याने कागदाचा अविष्कर केला. इस,सन ७१२ मध्ये एक सीमाबद्ध व स्पष्ट ब्लॉक प्रिंटिंगची स्थापना झाली . यासाठी लाकडाचा ब्लॉक बनवला होता . चीन मधेच इस ६५० मध्ये हीरक सूत्र नावाचे जगातील पहिले मुद्रित पुस्तक प्रकशित केले गेले . इस १०४१ मध्ये चीन मधल्या पाई शेंग नावाच्या व्यक्तीने चिनी मातीच्या साहाय्याने अक्षरे तयार केली. चीन मधेच जगातला पहिला मुद्रण कारखाना स्थापन झाला .ज्यामध्ये लाकडांच्या टाईपांचा प्रयोग केला गेला. टाईपांवर शाही सारखा पदार्थ पदार्थ पुसल्या जायचा आणि कागदावर दाब देऊन छापण्याचे काम केले जायचे. अशा प्रकारे मुद्रण कलेच्या आविष्काराचे आणि विकासाचे श्रेय चीनला जाते

02) यूरोप
१४-१५ व्य शतकात यूरोपमध्ये मुद्रणकला स्वतंत्र रूपाने विकसित झाले. त्या काळात यूरोपमध्ये मोठमोठे चित्रकार होते. त्यांच्या चित्रांच्या स्वतंत्र प्रतिकृती तयार करणे सोपे नव्हते. अक्षरांना छन्नी हातोड्याने ठोकून साचा तयार करणे खूपच अवघड काम होते. या कामासाठी खर्चही जास्त लागायचा आणि त्याची छपाई सुद्धा एवढी चांगली नव्हती, याच असुविधेने जर्मनीचे लॉरेन्स जेसंजोनला टाईप (धातूचा असा तुकडा की ज्यावर अक्षरे कोरलेले असतात) बनविण्यास प्रेरित केले .या टाईप चा प्रयोग सर्वप्रथम इस १४०० मध्ये यूरोप मध्ये झाला .

03) जर्मनी
जर्मनी चे जॉन गुटेनबर्ग यांनी इस १४४० मध्ये अशा टाईपांचा अविष्कार केला की, ज्यांची अदलाबदली करून बहुसंख्य प्रती छापणे सहज शक्य होऊ लागले, अशा प्रकारच्या टाईपाला पुनरावृत्ती छापे (रिप्रिंटेबल प्रिंट) असे सुद्धा म्हटले जाते. आणि याचेच फळ म्हणून असंख्य लोकांपर्यंत बिना अडथळा बातमी आणि मते पोहचविण्याची सुविधा मिळाली. जॉन गुटेनबर्ग यानेच इस १४५४ -५५ जगातला पहिला छापखाना ( प्रिंटिंग प्रेस ) स्थापन केली .व इस १४५६ मध्ये बायबल ची ३०० प्रती प्रकाशित करून पॅरिस ला पाठविले .या छापखान्यातून एकाचवेळी ६०० प्रती तयार केल्या जाऊ शकत होत्या परिणामतः ५०-६० वर्षांमध्ये यूरोप मध्ये जवळ जवळ २ करोड पुस्तके प्रिंट झाली होती

अशाप्रकारे मुद्रण कला जर्मनीपासून सुरु होऊन यूरोपीय देशात पसरली. सन १४७५ मध्ये सर विलियम केकस्टोन च्या प्रयत्नातून ब्रिटन मध्ये पहिली प्रेस स्थापन झाली .

म्हटले जाते. आणि याचेच फळ म्हणून असंख्य लोकांपर्यंत बिना अडथळा बातमी आणि मते पोहचविण्याची सुविधा मिळाली. जॉन गुटेनबर्ग यानेच इस १४५४ -५५ जगातला पहिला छापखाना ( प्रिंटिंग प्रेस ) स्थापन केली. इस १४५६ मध्ये बायबल ची ३०० प्रती प्रकाशित करून पॅरिस ला पाठविले .या छापखान्यातून एकाचवेळी ६०० प्रती तयार केल्या जाऊ शकत होत्या परिणामतः ५०-६० वर्षांमध्ये यूरोप मध्ये जवळ जवळ २ करोड पुस्तके प्रिंट झाली होती

अशाप्रकारे मुद्रण कला जर्मनीपासून सुरु होऊन यूरोपीय देशात पसरली सन १४७५ मध्ये सर विलियम केकस्टोन च्या प्रयत्नातून ब्रिटन मध्ये पहिली प्रेस स्थापन झाली. ब्रिटन मधल्या राजनैतिक व धार्मिक अशांतीच्या कारणाने छापखान्याची सुविधा व नियंत्रण सरकारच्या हातात होते. मुद्रण कलेचा इतिहास पडताळला असता स्पष्ट होते की छापखान्याचा विकास धार्मिक क्रांती साठी झाला. मुद्रण कला विकसित झाल्यानंतर धार्मिक ग्रंथ छापून लोकांपर्यंत पोहचविणे सहज शक्य झाले. धार्मिक ग्रंथ विविध देशांच्या भाषांमध्ये भाषांतरित करून प्रकाशित केले जाऊ लागले.

04) भारत

परमेश्वराच्या इच्छेनुसार ब्रह्मांडाची रचना व जीवांची उत्पत्ती झाली. यानंतर ध्वनी प्रकट झाला. ध्वनी पासून अक्षर तसेच अक्षरापासून शब्द बनले. शब्दांच्या संयोगाला वाक्य म्हटले जाऊ लागले.

यानंतर वडिलांपासून मुलांपर्यंत तसेच गुरूंपासून शिष्यांपर्यंत विचार, भावना, मते व माहितीचे आदान – प्रदान व्हायला लागले. भारतातील ऋषी मुनींनी ऐकण्याच्या क्रियेला श्रुती व समजून घेण्याच्या क्रियेला स्मृती असे नाव दिले. ज्ञानाच्या प्रचार प्रसाराचा हा मार्ग असीमित आणि असंतोषजनक होता, ज्या कारणाने मानवाला आपल्या पूर्वज आणि गुरु जणांच्या श्रेष्ठ विचारांना, मतांना, माहितीला लिपिबद्ध करण्याची जाणीव भासली आणि यातूनच लिपी चा अविष्कार झाला व दगडावर व झाडांवर कोरून मुद्रण आहे केले जाऊ लागले.

या तांत्रिक पद्धतीनेच सुद्धा विचारणा दीर्घकाळ टिकवणे किंवा सुरक्षित ठेवणे संभव होत नव्हते, मग त्यानंतर लाकडाची साल सोलून त्या सालीवर व भुज वृक्षाच्या पानावर लिहण्याची प्रक्रिया सुरु झाली. प्राचीन काळातील अनेक ग्रंथ भोजवृक्षाच्या सालपत्रावर लिहलेले आजही आढळते. पोर्तुगाल धर्मप्रचारासाठी व प्रसारासाठी मुद्रण कलेला सन १५५६ मध्ये गोवा मध्ये आणले. धर्मग्रंथ छापून प्रकशित केले जाऊ लागले. सन १५६१ साली गोवा मध्ये प्रकाशित बायबलच्या प्रति आजही न्यूयॉर्क लायब्ररी मध्ये सुरक्षित आहेत. याच गोष्टींची प्रेरणा घेत भारतीयांनी देखील आपले धर्मग्रंथ प्रकाशित करण्याचे सामर्थ्य दाखविले. भिमजी पारेख प्रथम भारतीय होते ज्यांनी दीव मध्ये सन १६७० मध्ये उद्योगाच्या रूपाने प्रेस सुरु केली.

सन १८११ च्या आसपास गोल फिरणारे सिलेंडर चालविण्यासाठी वाफेच्या शक्तीचा वापर केला जाऊ लागला. ज्याला आजकाल रोटरी प्रेस सुद्धा म्हटले जाते. याचा पूर्ण विकास १८४८ मध्ये झाला. १९ व्या शतकामध्ये विजेच्या साहाय्याने प्रेस चालविली जाऊ लागली .ज्याचा परिणाम नियोर्क टाइम्स च्या १२ पानांची ९६ हजार प्रतीचे प्रकाशन एका तासात करणे शक्य झाले. सन १८९० मध्ये लिनोटाईपचा अविष्कार झाला. ज्यात टाइपरायटर मशीन सारखी अक्षरांना सेट करण्याची सुविधा होती. सन १८९० पर्यंत अमेरिकेसोबतच अनेक देशामध्ये रंगीबिरंगी ब्लॉक, वृत्तपत्रे छापले जाऊ लागले . सन १९०० पर्यंत विजेवर चालणारी रोटरी प्रेस ,लिनोटाइप ची सुविधा तसेच रंगीबिरंगी चित्रे छापण्याची सुविधा ,फोटोग्राफी छापण्याची सुविधा विकसित झाल्यामुळे सचित्र वर्तमानपत्रे वाचकापर्यंत पोहचले जाऊ लागले
मुद्रण कलेच्या विकासातील प्रमुख पायऱ्या
०१) ब्लॉक प्रिंटिंग
०२) स्टेंसिल
०३)हलविता येणारे टाईप ( मुव्हेबल टाईप )
०४) रोटरी प्रिंटिंग
०५) लिथो प्रिंटिंग (१७९६) – यात दगडावर चिकण्या वस्तूने लेख लिहून किंवा डिझाईन बनवून छापण्याची कला आहे
०६) रंगीत छपाई
०७) ऑफसेट प्रिन्टिंग (१८७०) _ ऑफसेट मुद्रण कला ही मुद्रण कलेची एक सामान्य पद्धत आहे या पद्धतीमध्ये छापण्याची डिझाईन फपँटोग्राफीक पद्धतीने तयार केली जाते .लिथोग्राफिक प्रिंटिंग मधूनच ऑफसेट प्रिंटिंग ची सुरुवात झाली आहे
०८) स्क्रीन प्रिंटिंग- स्क्रीन प्रिंटिंग सुद्धा मुद्रण कलेची एक पद्धत आहे या पद्धतीमध्ये एखाद्या कापडावर इमल्सन लावून स्टेंसिल तयार केले जाते .ज्याला आवरण किंवा स्क्रीन प्रिंटिंग म्हटले जाते. ज्या तालावर छपाई करायची आहे त्यावर हे आवरण ठेऊन, आवरणावर शाही किंवा रंग पुसला जातो ज्यामुळे त्या तळावर संबंधित चित्रे किंवा अक्षर छापले जाते. या पद्धतीने टी शर्ट, पोस्टर , स्टिकर, विनाईल, लाकूड तसेच अन्य तळावर छपाई केली जाते
०९) फ्लेक्सओग्राफी
१०) फोटोकॉपीयर (१९६०)
११) लेझर मुद्रण (१९९६)
१२) डॉट मॅट्रिक्स प्रिंटिंग (१९७०)
१३) डिझिटल प्रेस (१९९३) – सध्या ह्याच पद्धतीने सगळ्या प्रकारचे मुद्रण केले जाते .
वर्तमानात वापरात असणाऱ्या लोकप्रिय मुद्रण कला

मुद्रण कला आज

वर्तमानात वापरात असणाऱ्या लोकप्रिय मुद्रण कला
०१) शीट फेड डिझिटल प्रिंटिंग – या मध्ये वेगवेगळ्या शीटचा वापर करून मुद्रण केले जाते.
०२) थ्री डी – सध्या खूप लोकप्रिय असलेले ३डी हे मुद्रण मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
०३) जेटटेड मटेरियल प्रिंटिंग – यात विशिष्ट फवारे आणि थरांच्या साहाय्याने मुद्रण केले जाते.
०४) इंकजेट – शाईच्या फवारणीद्वारे संबंधित आशयाचे मुद्रण केले जाते.
०५) लेझर प्रिंटिंग- हे इलेक्ट्रॉनिक डिझिटल प्रिंटिंग पद्धत आहे .यामध्ये शाई म्हणून टोनर चा उपयोग होतो आणि ड्रम महत्वाचा असतो. आय बी एम, कॅनन, झेरॉक्स,अँपल आणि अनेक कंपन्यांनी लेझर प्रिंटिंग वापरात आणले आहे

उद्या ची तंत्रज्ञानावर आधारित मुद्रण कला
आज संगणकीय तंत्रज्ञान एवढे विकसित होत आहे की उद्या च्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये प्रिंटिंग हे इतके सोपे होईल की जग सध्या ज्या स्मार्ट फोनच्या जाळ्यात इतका गुंतलेला आहे, त्या स्मार्ट फोन ला सुद्धा मिनी प्रिंटर आले तर त्यात नवल वाटू नये
उद्याची मुद्रण कला ही फक्त आणि फक्त कॉम्पुटर ,स्मार्ट फोन आणि तंत्रज्ञानावरच आधारित असेल. आणि अशी तांत्रिक मुद्रण कला विकासाठी फारच आवश्यक असेल यात काही शंकाच नाही

-मिलिंद एस. पाडेवार

 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!