Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जागतिक हृदय दिवस : नाशकात साकारले २० फुट उंच भव्य हृदयाची प्रतिकृती

Share

नाशिक : जागतिक हृदय दिना निमित्त हार्टस संजिवनी तर्फे फुग्यांचा उपयोग करुन २० फुट उंच भव्य अशी हृदयाची प्रतिकृती तय्यार करण्यात आली होती. धक धक नाशिक या कार्यक्रमाच्या माध्यमातुन हृदय तंदुरुस्त कसे असावे या विषयावर प्रबोधन करण्यात आले होते.

आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात हृदयाची व्यवस्थित काळजी घेत नसल्याने हृदयरोगाला बळी पडतो व त्यामुळे देशात दरवर्षी लाखों रुग्ण मरण पावतात. आपण हृदयाची वेळीच काळजी घेतली तर आपले हृदय व्यवस्थित काम करते व व्यक्तिचे वय वाढते. आजच्या जमान्यात २५-३० वर्षांच्या युवकांमध्ये ही हृदयआघात सर्रास घडु लागला आहे. फीट राहण्याच्या वयात ते जीवनास मुक्त आहे, यासाठी काय काय काळजी घ्यावी तसेच हृदय ब्लॉक झाल्यास कोणतीही शस्त्रक्रिया न करता हृदय कसे चांगले करावे याची माहिती हार्टस संजिवनी चे संचालक डॉ. संजय पाटील यांनी माहिती दिली.

स्वतःला हृदयरोगापासून सुरक्षित ठेवायचे असल्यास सदर कार्यक्रमात पुढील गोष्टी सांगण्यात आल्या. रोज १५ मिनिटे दिलखुलास हसा, योगाद्वारे स्वतःला तंदुरुस्त करता येते, हृदय आघात झाला तर तात्काळ काय उपाययोजना कराव्या याविषयी माहिती दिली.

यावेळी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिल के दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. हितेंद्र महाजन, लायन्स क्लब सुप्रीम चे अध्यक्ष सतीश कोठारी, महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, योगा शिक्षक राम शिंदे, जेसीआय अंबडचे अध्यक्ष प्रतिक कुलकर्णी, धावपटु महेंद्र छोरिया, मोनालिसा जैन, कुसुमाग्रज हास्य क्लबच्या अध्यक्षा सौ. हास्य योग समिती नासिक जिल्हाच्या अध्यक्षा आदिती वाघमारे शामिल होते.

दोन हजार फुग्यांचा उपयोग
हि प्रतिकृती तयार करण्यासाठी दोन हजार फुग्यांचा उपयोग करण्यात आला आहे. यासाठी दहा कारागिरांच्या माध्यमातून एका दिवसात तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे भारतात पहिल्यांदाच एवढी मोठी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!