Type to search

Breaking News आवर्जून वाचाच ब्लॉग मुख्य बातम्या

जागतिक बालमजुरी विरोधी दिवस : बाल मजुरीला थांबवूया, कोमल जिवाला स्वच्छंदपणे जगवूया

Share

(जागतिक बालमजुरी विरोधी दिवस विशेष – 12 जून 2019)

बालपण शब्द ऐकल्या बरोबर आपल्या डोळयांसमोर कोमल, हसरे, निरागस जीवन लक्षात येते. कोणत्याही कामाचे टेंशन, भिती नसते, खेळकर व मजेचे जीवन असते बालपण. पण समाजात सगळीकडे असे स्फुर्तीदायक वास्तविक जीवन दिसत नाही. बालपणाची दूसरी बाजूपण आहे जी समाजातील कटूसत्य परिस्थितीशी जाणीव करून देते, ती म्हणजे बालमजुरी.

आज आपल्याला बालकामगार प्रत्येक ठिकाणी आढळतात. जसे की भाजी-पाला विकतांना, चहा टपरी व लहान हाॅटेलात, कारखान्यात, खानीत, कैटेरींग, दुकानात, बस स्टैंड, रेल्वे स्टेशन वर रस्त्यांवर सामान विकतांना, शेतात व इतर ठिकाणी दिसून येतात.

ज्या वयात लहान मुलांचा हातात पुस्तके असायला हवी त्या वयात मुलांना मजुरी करावी लागते, ही समाजासाठी खुप लाजिरवाणी बाब आहे. समाजातील सर्वात मोठी समस्या दिसून येते. या बालमजुरीच्या समस्येला विरोध करण्याकरीता १२ जून हा दिवस जागतिक बाल मजुरी विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

बालमजुरीची प्रमुख कारणे
दारिद्री, अनाथ, परीवारातील सदस्यांची बेरोजगारी किंवा अत्यल्प उत्पन्न, कामाचा निमित्ताने पालकांचे होणारे स्थलांतर, परंपरा, रूढी चालीरीती, पालकांमध्ये शिक्षणाचा अभाव व मुलांवर नियंत्रणाचे अभाव दुर्लक्ष, अक्षम शासकीय योजना व त्यांचे नियोजन, मुलांच्या प्रश्नांकडे बघण्याची शासनाची उदासीनता, कायद्याचे पालन करण्याचे अभाव, घरातील वादविवादाला कंटाळून अनेक मुलं घर सोडून जातात व बाहेर कामे करायला लागतात. यामुळे शिक्षणात खंड पडल्याने परिणामी शाळा सुटते. यासारखी कारणे बालमजुरीस कारणीभुत ठरतात.

दरम्यान भारतात अनेक ठिकाणी बालमजुरी साधारण गरीबीमुळे होते. या समजूतीने बालमजूरीला सहानभूती मिळते. पण जर गरीबांची मुले बालमजूर होत असतील तर सर्व गरीबांची मुले मजूरीला का जात नाहीत, हा प्रश्न त्यांना का पडत नाही. शिक्षणाचे महत्व ज्या गरीबांना पटलेले असते ते मुलांना मजुरीला पाठवत नाहीत. ज्यांना शिक्षणाचे महत्व नसते त्याच कुटूंबातील मुले मजूरीला जातात. तेव्हा शिक्षणाचे महत्व गरीबांना पटविणे हाच बालमजूरीवर दिर्घकालीन उपाय आहे.

एक जागरूक नागरीक म्हणुन आपले कर्तव्य
कुठेही बालकामगार आढळल्यास त्वरीत पोलीसांना व मुलांचा सरंक्षण संस्थांना कळवावे.मुलांना सांभाळणाऱ्या संरक्षण संस्था मुलांनाच नीट सांभाळ करतात का , याबाबत चौकशी करावी. काही चाइल्ड हेल्पलाईन नंबर असतात इथेही कळवावे. भारतात एक कॉमन १०९८ हा चाईल्डलाईन सव्हिस नं. असून यावर ही माहिती पाठवू शकता. ही सव्हिस 24 तास टोल-फ्री सेवा आहे. भारत सरकारची चाईल्डलाईन इंडीया फाउंडेशन ही सेवा चालवीते.

  • ( लेखक : प्राध्यापक – डाॅ. प्रितम भि. गेडाम )

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!