नाशिकच्या महिलेने दिला चार मुलांना जन्म

0
नाशिक | गेल्या महिन्यात नाशिकच्या एका महिलेने मुंबईच्या जे.जे रुग्णालयात चार मुलांना जन्म दिला होता. ही घटना कोणालाही माहिती नव्हती. मुलांमध्ये एक मुलगा आणि तीन मुली असून त्या सुखरूप आहेत. एक महिनाभर या मुलांना दवाखान्यातच ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची सुट्टी करण्यात आली.
Photo Source : My Medical mantra

मुलांच्या आईचे नाव जहानरा शेख असून सहाव्या महिन्यात करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये पोटात चार गर्भ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जून महिन्यात मुंबईच्या जे.जे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.

Photo Source : My Medical mantra

जहानरा लग्नानंतर सहा वर्षांनी पत्नी गरोदर राहिली होती.त्यामुळे तब्बेतीची काळजी होतीच. चार गर्भ असल्याने पत्नीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे नाशिकमधील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पती नाझीम शेख यांनी पत्नीला जेजे रुग्णालयात दाखल केले होते अशी माहिती पती नाझीम शेख यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Photo Source : My Medical mantra

येथील डॉक्टर प्रिती लुईस यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयातच उपचार सुरू होते.

रुग्णालयातून घरी सोडले तेव्हा जहानराच्या मुलाचे वजन २ किलो ग्रॅम, पहिल्या मुलीचे वजन १.९ किलो, दुसरी मुलगी १.८ किलो आणि तिसऱ्या मुलीचे वजन १.८ किलो ग्रम होते.

LEAVE A REPLY

*