Type to search

नाशिक फिचर्स

कडाक्याच्या थंडीत दर वाढूनही सुकामेव्याची चलती

Share

नाशिक । प्रतिनिधी
थंडी म्हटलं की तरुणाईमध्ये व्यायाम करण्याची फॅशन अजूनही कायम आहे. हिवाळा ऋतू हा आरोग्यवर्धक असल्यामुळे या मोसमात विशेष आहार घेतल्यास आरोग्य सुधारते. त्यामुळे या काळात सुकामेवा खाण्यावर भर दिला जातो. हिवाळ्यात सुकामेवा म्हणजेच खारीक, खोबरे, आणि काजू, बदाम या वस्तूंसह विविध पदार्थ खाण्याकडे अजूनही कायम आहे. सुकामेव्याचे दर मागील वर्षापेक्षा जादा असले तरी सुकामेवा खरेदी करण्याकडे गृहिणींचा कल सध्या अधोक दिसून येत आहे.

थंडीच्या दिवसात प्रकृती सुधारण्यासाठी प्रत्येक घरात सुकामेवा खाण्याबरोबरच मेथीचे,डिंकाचे लाडू बनविण्याची पद्धत अजूनही कायम आहे. मिठाई व लाडू बनवितांना त्यामध्ये खारीक, खोबरे,बेदाणे, काजू,बदाम टाकले जातात.सध्या हिवाळा सुरू असल्याने पौष्टिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करण्यासाठी गृहिणींची सध्या रेलचेल सुरू आहे. यासाठी लाडू साठी खारीक, खोबरे यांची या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने महिला ग्रामीण भागात घरोघरी, वस्त्यांवर जाऊन खारीक, खोबरे, डिंकाची विक्री करताना दिसून येत आहे.

डिंकाच्या लाडूबरोबरच काजू,बदाम,मनुका,आक्रोड,चारोळी, खारीक,खजूर अशा आरोग्यवर्धक सुकामेव्याला सध्या पसंती मिळत आहे लहान मुलांनाही हे पदार्थ आवडतात त्यातच त्यांची प्रकृती ही सुधारणार असल्याने महिला या वस्तूंची खरेदी करत आहेत. सुकामेव्यापासून लाडू, रव्याचे लाडू, बेसन लाडू आणि मेथीचे लाडू अशा विविध प्रकारांमध्ये खारीक, खोबर्‍याबरोबरच मनुका,काजु,बदाम असे पदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे या सुकामेव्याला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असून दुकानांमध्ये महिलांंची या वस्तू खरेदीसाठी गर्दी आहे.

फास्टफूड जमान्यात सुकामेव्याला पसंती
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या फास्टफूडचा जमाना असला तरी सुकामेव्याचा वापर करण्याबाबत आहार तज्ञांकडून सांगितले जाते. सुकामेवा खाल्ल्याने 15 ते 20 टक्के आजार कमी होतात त्यामुळे सुकामेवा खरेदीचा कल कायम आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!